शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ सुरू; पण ‘रेकॉर्ड’ मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 14:20 IST

ग्रामसेवक संपावर असल्याने ग्रामपंचायतींकडून कामांचे ‘रेकॉर्ड’ उपलब्ध होत नसल्याने, ‘सोशल आॅडिट’मध्ये अडथळा निर्माण झाला आहे.

- संतोष येलकरअकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत २०१८-१९ या वर्षात विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल आॅडिट) २८ आॅगस्टपासून सुरू करण्यात आले; मात्र ग्रामसेवक संपावर असल्याने ग्रामपंचायतींकडून कामांचे ‘रेकॉर्ड’ उपलब्ध होत नसल्याने, ‘सोशल आॅडिट’मध्ये अडथळा निर्माण झाला आहे.शासनाच्या ग्रामविकास विभाग व सामाजिक अंकेक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यातील कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येत आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत २०१८-१९ या वर्षांत विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ २८ आॅगस्टपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये तीनही तालुक्यांत ग्रामपंचायतनिहाय यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या ‘नरेगा’ कामांची पाहणी ग्राम साधन व्यक्तींच्या पथकांमार्फत करण्यात येत आहे. तसेच करण्यात आलेल्या कामानुसार ग्रामपंचायतींकडे ‘रेकॉर्ड’ उपलब्ध आहे की नाही, यासंदर्भात तपासणी करण्यात येत आहे; परंतु ग्रामसेवकांचा संप सुरू असल्याने ग्रामपंचायतींकडून कामांचे ‘रेकॉर्ड’ उपलब्ध होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील १२० ग्रामपंचायती अंतर्गत ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ सुरू करण्यात आले असले तरी, ग्रामसेवक संपावर असल्याने ग्रामपंचायतींकडून कामांचे ‘रेकॉर्ड’ मिळत नसल्याने, सोशल आॅडिटमध्ये कामांच्या रेकॉर्ड तपासणीत अडथळा निर्माण झाला आहे.१२० ग्रामपंचायती अंतर्गत कामांचे ‘सोशल आॅडिट’ सुरू!जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत प्रत्येकी ४० ग्रामपंचायती अंतर्गत याप्रमाणे तीनही तालुक्यांतील १२० ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये ग्राम साधन व्यक्तींच्या पथकांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी आणि ‘रेकॉर्ड’ची तपासणी करण्यात येत आहे.‘या’ कामांचे सुरू आहे ‘सोशल आॅडिट’!‘नरेगा’ अंतर्गत जिल्ह्यातील अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांत २०१८-१९ या वर्षांत नरेगा अंतर्गत विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या कामांचे ‘सोशल आॅडिट’ सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये सिंचन विहीर, घरकुल, शौचालय, पाणंद रस्ते, वृक्ष लागवड, शोषखड्डे, सलग समतल चर, रोपवाटिका, सार्वजनिक रस्त्यांवरील वृक्ष लागवड, तुती लागवड, फळबाग लागवड इत्यादी कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला