शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल पुरवठा सुरळीत; एसटीच्या सर्व बसफेऱ्या नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 11:09 IST

Akola News : डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याने सर्वच नियोजित फेऱ्या नियमित धावत आहेत.

अकोला : एसटी महामंडळातील बहुतांश आगारांना आता डिझेल संकटाचा सामना करावा लागत असल्याने बसेस मधूनच बंद करण्याची वेळ येत आहे. परंतु जिल्ह्यात डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याने सर्वच नियोजित फेऱ्या नियमित धावत आहेत. मात्र, प्रवाशांअभावी उत्पन्नावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.

‘ब्रेक द चेन’अंतर्गत बसेस सुरू होऊनही येथील आगाराला त्याचा मोठा फायदा झाला नाही. त्यातच आता प्रवाशांकडून कमी-जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने काही आगारातून सुटणाऱ्या मध्यम व लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या डिझेल खर्चाचा भार पडत आहे. तरी अकोला जिल्ह्यात सर्वच आगारांत डिझेलचा पुरवठा असल्याने बसफेऱ्या नियमित धावत आहेत.

 

जिल्ह्यातील आगार आणि असलेल्या बसेस

आगार क्र. १ - २६

आगार क्र. २ - ३०

अकोट - ३५

तेल्हारा - १९

मूर्तिजापूर - १७

नियोजित सर्वच फेऱ्या सुरू

अकोला जिल्ह्यातील पाचही आगारात डिझेलचा व्यवस्थित पुरवठा होत असल्याने प्रत्येक आगाराकडून नियोजित बसफेऱ्या नियमित सोडल्या जात आहेत. काही बसगाड्या मात्र तांत्रिक बिघाडामुळे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. काही बसेस प्रवासी नसल्याने आगारातच उभ्या असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या बसगाड्यांमुळे नियोजित फेऱ्यांवर कसलाही परिणाम झालेला नाही.

सर्वच आगारांना डिझेल पुरवठा

एसटी महामंडळाच्या अनेक आगारांना डिझेल तुटवडा भासत असल्याने बसफेऱ्या रद्द करण्याची वा बसगाड्या आगारातच उभ्या ठेवण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यात मात्र असा कोणताही प्रकार नसून, सर्वच आगारांना दिवसाकाठी आवश्यक प्रमाणात डिझेलचा पुरवठा होत आहे.

डिझेलच्या किमती वाढल्याने फटका!

आधी डिझेलचा दर कमी होता. आता एसटीला ९२ रुपये प्रतिलीटर डिझेल कंपनीकडून थेट खरेदी करावे लागत आहे. डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे २८ रुपयांचा तोटा एसटीला भरून काढावा लागत आहे. डिझेलवर होणाऱ्या खर्चामुळे एसटीला मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटी