शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांना आज निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:53 IST

अकोला जिल्हय़ात गत १२ दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला आज निरोप देण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी गणेश मंडळांनी जोरात केली असून, यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. बाप्पांच्या विसर्जनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी पूर्ण केली आहे, तर ही मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देविसर्जन मिरवणूक मार्गावर पथ संचलनअधिकारी-कर्मचार्‍यांची झाली बैठकसीसी कॅमेर्‍यांद्वारे नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ात गत १२ दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला आज निरोप देण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी गणेश मंडळांनी जोरात केली असून, यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. बाप्पांच्या विसर्जनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी पूर्ण केली आहे, तर ही मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. मानाच्या गणपतीचे पूजन करून सकाळी १0 वाजता या मिरवणुकीस जय हिंद चौक येथून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर शहराच्या विविध भागातून गणरायांची वाजतगाजत मिरवणूक झाल्यानंतर गणेश घाटांवर गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे.गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी अकोला पोलीस प्रशासनाद्वारे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये ८८३ अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश असून, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला अकोला पोलिसांनी या मार्गावर पोलिसांनी पथ संचलन केले. त्यानंतर अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक घेण्यात आली असून, यामध्ये दक्ष राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सर्व पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखांकडून अधिकारी व कर्मचार्‍यांची मािहती मागितली होती. त्यानुसार बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोमवारी बंदोबस्तासंदर्भात पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस अधीक्षक उमेश माने, पोलीस उपअधीक्षक सुभाष माकोडे यांनी सूचना दिल्या.