शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

प्राचार्यासह सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:40 IST

मूर्तिजापूर : तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी नियुक्त केलेले पाच कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित झाले नाही. या कारणावरून दाखल तक्रारीवरून मूर्तिजापूर पोलिसांनी वॉरंट बजावून स्थानिक गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्यासह सहा कर्मचार्‍यांना ६ ऑक्टोबर रोजी अटक केली. या घटनेने सर्वत्र प्रचंड खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या कामाला कर्मचारी न पाठविणे भोवले ! 

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी नियुक्त केलेले पाच कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित झाले नाही. या कारणावरून दाखल तक्रारीवरून मूर्तिजापूर पोलिसांनी वॉरंट बजावून स्थानिक गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्यासह सहा कर्मचार्‍यांना ६ ऑक्टोबर रोजी अटक केली. या घटनेने सर्वत्र प्रचंड खळबळ माजली आहे.मूर्तिजापूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ही निवडणुकीची प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पाडण्याकरिता तालुक्यातून विविध कार्यालयांतील ८00 अधिकारी व कर्मचार्‍यांना पाचारण करण्यात आले होते. या निवडणुकीदरम्यान गाडगे महाराज महाविद्यालयातील १४ कर्मचार्‍यांना उपस्थित राहण्याचा आदेश निवडणूक अधिकार्‍यांनी दिला होता; परंतु निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात गाडगे महाराज महाविद्यालयातील पाच कर्मचारी वेळेवर हजर राहिले नाही. म्हणून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी राहुल तायडे यांनी नायब तहसीलदार डाबेराव यांना संबंधित महाविद्यालयात पाठवून प्राचार्याची भेट घेऊन आदेश दिलेल्या कर्मचार्‍यांना पाठविण्यास सांगितले. तरीही प्राचार्याने पाच कर्मचार्‍यांना न पाठविल्यामुळे निवडणूक अधिकार्‍यांनी मूर्तिजापूर पोलीस स्टेशनमध्ये प्राचार्यासह सहा कर्मचार्‍यांविरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली. त्यावरून ठाणेदारांनी त्वरित कारवाई करून पीएसआय खंडेराव यांना वॉरंट घेऊन पाठवून प्राचार्यासह सहा कर्मचार्‍यांना अटक करून तहसील कार्यालयात नेले. या अटक केलेल्यांमध्ये प्राचार्य संतोष ठाकरे, प्रा. दिवाकर पवार, मुख्य लिपिक हरिभाऊ बोपटे, प्रा. दिलीप शहाडे, प्रा. अनिल ठाकरे, प्रा. सचिन मारोडे यांचा समावेश असून, त्यांना पुढील कारवाई करून वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आले, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार राहुल तायडे यांनी दिली आहे.