शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात डेंग्यूचे सहा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 14:04 IST

अकोला जिल्ह्यातही डेंग्यू, चिकुनगुनियासदृश तापाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मध्यंतरी झालेल्या परतीच्या पावसानंतर वातावरणातील बदलाचा फटका अकोलेकरांना बसत आहे. अकोला शहरासह ग्रामीण भागातही व्हायरल फिव्हरने डोकेदुखी वाढविली असून, जिल्ह्यात गत महिनाभरात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळून आले. त्यामुळे डेंग्यूपासून सावध राहा, असा सल्ला आरोग्य विभागातर्फे अकोलेकरांना देण्यात आला आहे.सध्या राज्यभरात डेंग्यू, चिकुनगुनियाने थैमान घातले आहे. अकोला जिल्ह्यातही डेंग्यू, चिकुनगुनियासदृश तापाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. शिवाय, वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्यासह तापाच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसोबतच खासगी दवाखाने हाउसफुल्ल झाली आहेत. जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचे सहा, तर चिकुनगुनियाचे चार रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषत: डेंग्यूपासून बचावासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. आॅक्टोबर महिन्यापर्यंत डेंग्यूच्या प्रसाराचा धोका संभवत असल्याने जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे १५ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत कंटेनर सर्व्हेची विशेष मोहीम राबविण्यात आली. परतीचा पाऊस लांबल्याने मोहिमेचा कालावधी दोन आठवडे वाढविण्यात आला आहे.जिल्ह्यात आरोग्य विभागाचा कंटेनर सर्व्हेदिवस परतीचा पाऊस लांबल्याने जिल्हा हिवताप विभागातर्फे कंटेनर सर्व्हेचा कालावधी आणखी १५ दिवस वाढविण्यात आला आहे. हा सर्व्हे १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, यांतर्गत जिल्ह्यात यापूर्वी ज्या ज्या भागात डेंग्यूसदृश रुग्ण आढळले, अशा ठिकाणी घरोघरी जाऊन पाणी साठविण्याच्या भांड्यांची पाहणी केली जाणार आहे तसेच परिसरातील स्वच्छतेचीही पाहणी केली जाईल.

चिकुनगुनियाचाही धोकाव्हायरल फिव्हरमुळे नागरिक सर्दी, खोकला तापीने त्रस्त आहेत. अशातच डेंग्यूचे सहा, तर चिकुनगुनियाचे चार रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यूसह चिकुनगुनियाचाही धोका असल्याने नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.जिल्ह्यात कंटेनर सर्व्हेच्या मोहिमेचा कालावधीही वाढविला आहे. यांतर्गत जिल्ह्यातील डेंग्यूसदृश भागात सर्व्हे करण्यात येणार आहे; मात्र नागरिकांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या.- डॉ. विवेक पेंढारकर, जिल्हा हिवताप अधिकारी.

टॅग्स :dengueडेंग्यूAkolaअकोला