शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’नराधम शिक्षकाला सहा दिवसांची पाेलिस काेठडी; जिल्हा व सत्र न्यायालयात केले हजर

By आशीष गावंडे | Updated: August 21, 2024 22:27 IST

यादरम्यान, काेणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी न्यायालय परिसरात पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. 

आशिष गावंडे/अकोला

अकोला: बाळापूर तालुक्यातील एका गावात जिल्हा परिषद शाळेत इयत्ता आठव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थीनींचा लैंगिक छळ करणारा नराधम शिक्षक प्रमोद मनोहर सरदार याला उरळ व अकाेला पाेलिसांनी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले असता, न्यायाधिश ए.डी.क्षिरसागर यांनी २६ ऑगस्ट पर्यंत पाेलिस काेठडी सुनावली. यादरम्यान, काेणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी न्यायालय परिसरात पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. 

उरळ नजीकच्या एका गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रमोद मनोहर सरदार हा शिक्षक गणित व विज्ञान शिकवतो. शिकवणी वर्गाच्या नावाखाली हा शिक्षक मुलींसाेबत वाइट उद्देशातून संवाद साधून शारिरिक लगट करीत हाेता. माेबाइलमधील अश्लिल व्हीडीओ दाखवून मुलींना लज्जा निर्माण हाेइल,अशा प्रकारे बाेलत असे. शिक्षकाचे अश्लिल संभाषण न पटल्यामुळे सहा विद्यार्थीनींनी शिकवणी वर्गाला जाणे बंद केले. त्यानंतर जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकाने याच सहा मुलींचा लैंगिक छळ सुरू केला. हा प्रकार असह्य हाेत असल्यामुळे या सहा विद्यार्थिनींनी ही बाब शाळेतीलच एका महिला शिक्षिकेला सांगितली. महिला शिक्षिकेने घडलेला सर्व प्रकार चाइल्ड हेल्पलाइनवर सांगितल्यानंतर या अश्लाघ्य प्रकाराला वाचा फुटली.शिक्षकाविरुध्द तातडीने कारवाइ

धाडस दाखवत सहा विद्यार्थीनींनी एकत्र येत उरळ पाेलिसांकडे तक्रार नाेंदवली. तक्रारीचे गांभीर्य पाहता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शिक्षकाला तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले. उरळ पाेलिसांनी आरोपी शिक्षकाविरुध्द पोक्सो कायद्याच्या कलम ८,१० व १२ नुसार तसेच बीएनएस कलम ७४ व ७५ अन्वये गुन्हा दाखल केला.