शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सहा उमेदवार रिंगणाच्या बाहेर!

By admin | Updated: February 5, 2017 02:47 IST

अकोला महापालिका निवडणूक; सात उमेदवारी अर्ज ठरले बाद!

अकोला, दि. ४- महापालिका निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जातील त्रुटी इच्छुक उमेदवारांच्या अंगलट आल्या आहेत. प्राप्त अर्जांची शनिवारी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी छाननी केली असता, १३ उमेदवारी अर्ज बाद ठरले. यामधील सहा उमेदवार निवडणूक रिंगणातून बाद झाल्याची माहिती मनपा निवडणुक कार्यालयाकडून देण्यात आली. महापालिका निवडणुकीचा आखाडा गाजवण्यासाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे निकष लक्षात घेता, यंदा उमेदवारी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना संबंधिताना चांगलाच घाम फुटल्याचे दिसून आले. उमेदवारांना ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज सादर करावे लागले. अर्जाची प्रिंटआउट काढून त्याला आवश्यक सर्व कागदपत्रांच्या स्वाक्षांकित प्रती जोडून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करण्यात आले. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिवशी महापालिकेकडे एकूण ८८२ अर्जांची नोंद घेण्यात आली. आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्जाचा नमुना तयार करण्यात आला होता. नमुन्यानुसार उमेदवारी अर्जातील कोणताही रकाना इच्छुक उमेदवारांना रिक्त ठेवता येणार नसल्याने माहिती निरंक असल्यास किंवा लागू नसल्यास तसे नमूद करावे लागले. शपथपत्रातील कोणत्याही रकान्यामधील माहिती न भरल्यास किंवा रिक्त ठेवल्यास उमेदवारी अर्ज बाद होणे निश्‍चित होते. ज्या प्रभागातून तसेच आरक्षणातील प्रवर्गानुसार निवडणूक लढवायची आहे, त्या प्रभागाचा क्रमांक, आरक्षणाच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख करावा लागणार होता. उमेदवारी अर्ज भरताना जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशील देताना प्रत्येक बाबीचा तपशील स्वतंत्रपणे द्यावा लागला. वैयक्तिक शौचालय असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागले. अशा विविध माहितीसह सादर करण्यात आलेल्या ८८२ उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शनिवारी (४ फेब्रुवारी) पार पडली. यावेळी १३ उमेदवारी अर्ज बाद ठरले असून, यापैकी ६ उमेदवार अपात्र ठरले.