शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडे २ लाख ४१ हजारांवर सिंगल फेज मीटर उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:16 IST

महावितरणकडून दरवर्षी सुमारे ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मार्च २०२० नंतर कोरोना प्रादुर्भाव व ...

महावितरणकडून दरवर्षी सुमारे ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मार्च २०२० नंतर कोरोना प्रादुर्भाव व ‘लॉकडाऊन’मुळे नवीन वीज मीटरची उपलब्धता काही प्रमाणात कमी झाली होती. मीटरअभावी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध झालेले वीज मीटर तातडीने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश मुख्य कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेले आहेत.

नवे १ लाख ४४ हजार मीटर प्राप्त

नव्याने प्राप्त झालेले १ लाख ४४ हजार ९०४ वीज मीटर सद्य:स्थितीत महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयांना देण्यात आले आहेत. यापैकी पुणे प्रादेशिक कार्यालयाकडे ३८ हजार ७०४, कोकण प्रादेशिक कार्यालयाकडे ६९ हजार ७००, नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडे २० हजार तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाकडे १६ हजार ५०० या प्रमाणात वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

ऑगस्टअखेरपर्यंत मिळणार १४ लाख मीटर

सद्य:स्थितीत महावितरणला दररोज सुमारे ८ ते १० हजार नवीन वीज मीटरचा पुरवठा सुरू झाला असून, मार्चअखेर सिंगल फेजचे ३ लाख २० हजार आणि थ्री फेजचे ६० हजार नवीन मीटर उपलब्ध होणार आहेत. तसेच एप्रिल ते ऑगस्ट-२०२१ पर्यंत सिंगल व थ्री फेजचे तब्बल १४ लाख ६० हजार नवीन वीज मीटर उपलब्ध होणार आहेत. महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सध्या सिंगल फेजचे २ लाख ४१ हजार ८८२, तर थ्री फेजचे २८ हजार ३८६ नवीन वीज मीटर उपलब्ध असून वीज मीटरचा कोणताही तुटवडा भासणार नाही. ग्राहकांनी खुल्या बाजारातून वीज मीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.