शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

जिल्ह्यात ‘सिंघम’ अवतरणार; दहाव्या मिनिटाला पोलीस मदत मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:17 IST

नवी हेल्पलाईन ठरणार वरदान : जिल्हाभरात लवकरच होणार कार्यान्वित अकोला : जिल्ह्यातील पोलिसांशी तत्काळ संपर्क साधण्यासाठी ‘१००’ हा हेल्पलाईन ...

नवी हेल्पलाईन ठरणार वरदान : जिल्हाभरात लवकरच होणार कार्यान्वित

अकोला : जिल्ह्यातील पोलिसांशी तत्काळ संपर्क साधण्यासाठी ‘१००’ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. तो आता बदलला जाणार असून, लवकरच ‘११२’ या एकाच हेल्पलाइनवरून सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. हा नंबर डायल केल्यानंतर अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी हजर राहतील, असे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी ९ चारचाकी वाहने देण्यात आली आहेत.

जिल्ह्यात एकूण २३ पोलीस ठाणे आहेत. त्यात ११२ अधिकारी व २३२५ अंमलदार कार्यरत आहेत. दरम्यान, या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास त्यांना यापुढे ११२ हा हेल्पलाईन क्रमांक डायल करावा लागणार आहे. विशिष्ट यंत्रणेच्या साहाय्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदांत हा फोन कोठून आला, हे संबंधितांना कळणार आहे. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाइन, चाइल्ड हेल्पलाइन यांना एकाचवेळी सदर कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊ शकतील. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र पातळीवर एकच हेल्पलाइन असावी, असा सूर सर्व स्तरातून उमटला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे.

......................

काॅल येताच कळणार लोकेशन

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कुठलीही घटना घडल्यास पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाईन क्रमांक लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे. या क्रमांकावरून काॅल येताच विशेष यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या साहाय्याने काॅल नेमका कोठून आला, याचे लोकेशन कळण्याची व्यवस्था उभी केली जात आहे. त्यामुळे पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचणे, आरोपी फरार होणे यासह इतरही बाबींना आळा बसणार आहे.

...................

३० चारचाकी, ४८ दुचाकी वाहनांची मागणी

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अकोला पोलीस दलात ९ चारचाकी वाहने दाखल झाली आहेत. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी ३० चारचाकी वाहने व ४८ दुचाकी वाहने देण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे. या अद्ययावत वाहनांमुळे पोलिसांना आपले कर्तव्य अधिक गतीने बजाविण्यासाठी मदत होणार आहे.

....................

५५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

राज्यातील इतर जिल्ह्यांसह अकोला जिल्ह्याचेही सध्या ‘जिओ टॅगिंग’ केले जात आहे. त्याचबरोबर ‘सेंट्रलाइज कंट्रोल रूम’ला फोन आल्यावर कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा, स्थानिक कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची याबाबत प्रशिक्षण प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. अकोला जिल्हा पोलीस दलातील दोन अधिकारी, १८ वायरलेसचे कर्मचारी व इतर विभागाचे २० पोलीस कर्मचारी अशा प्रकारे एकूण ५५ पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

.......................

पोलीस मदत हवी असल्यास ११२ डायल करा

जिल्ह्यातील कुठल्याही गावातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलिसांची मदत हवी असल्यास त्यांनी ११२ नंबर डायल करायचा आहे. त्यापुढच्या अवघ्या १० मिनिटांमध्ये पोलीस मदतीला धावून येतील, असे नियोजन करणे सुरू आहे.

नवा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, लवकरच ही सुविधा जिल्हाभरात पुरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळाली.

...............

गेल्या काही वर्षांत पोलीस दल अधिक ‘हायटेक’ करण्याचे प्रयत्न शासन स्तरावरून सातत्याने केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुठेही घटना घडल्यास त्याठिकाणी पोलीस तत्काळ पोहोचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे. यासाठी अकोला पोलिसांनी पूर्ण प्रशिक्षण घेतले असून, ही हेल्पलाईन सुरू होताच पूर्ण प्रतिसादाने अकोला पोलीस कार्यरत होणार आहेत.

- जी श्रीधर

जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला

............