शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘सिमी’च्या दहशतवाद्यास अकोला कारागृहात हलविणार!

By admin | Updated: January 8, 2017 02:40 IST

एटीएसच्या विशेष न्यायालयाची मंजुरी, नागपुरातून आणणार अकोल्यात.

अकोला, दि. ७-यवतमाळ जिल्हय़ातील पुसद येथील पोलीस कर्मचार्‍यावर हल्ला प्रकरणातील आरोपी सिमी या दहशतवादी आणि प्रतिबंधित संघटनेचा सदस्य असलेल्या सलीम मलिक ऊर्फ हाफिज मुजीबुर्ररहेमान याला नागपूर कारागृहातून अकोला कारागृहात हस्तांतरित करण्याचा विनंती अर्ज एटीएसच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयाने शनिवारी मंजूर केला. सदर आरोपीसोबत असलेल्या अन्य दोन आरोपींच्या जामीन अर्जावर आणि नागपुरातून अकोला कारागृहात हस्तांतरण प्रक्रियेच्या अर्जावर २१ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.पुसद येथील पोलीस कर्मचार्‍यावर येथील रहिवासी तसेच सिमी संघटनेचा सदस्य अब्दुल मलिक अब्दुल रज्जाक, हाफिज मुजीबुर्ररहेमान खान आणि शोएब अहेमद खान या तिघांनी २५ सप्टेंबर २0१५ रोजी प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी अकोला एटीएसने सदर तीनही आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0७, ३३२, ३३३, १५३, १८६ आणि आर्म्स अँक्टच्या कलम ४, २५ आणि १३५ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अकोला येथे कार्यान्वित झालेल्या एटीएसच्या विशेष न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. एटीएसच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात मुजीबुर्ररहेमान खान याला नागपूर कारागृहातून अकोला कारागृहात हस्तांतरित करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर शनिवारी सुनावणी झाली असून, त्यांच्या न्यायालयाने आरोपीच्या हस्तांतरण करण्यास मंजुरी दिली आहे, तर अन्य दोन आरोपींच्या अर्जावर २१ जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.