शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूती रजेवर असताना केली धनादेशावर स्वाक्षरी!

By admin | Updated: April 8, 2017 01:49 IST

निंभोरा येथील ग्रामसेविकेचा प्रताप

वल्लभनगर : प्रसुती रजेवर असतानाही ठेकदाराला ४ लाख १७ हजार ७६० रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी केल्याचा प्रताप निंभोरा गट ग्रामपंचायतच्या सचिव आर.डी.तळवी यांनी केल्याचे समोर आले आहे. सरपंच व ग्रामसेवकाने अपहार केला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी उपसरपंचासह सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास १ मे रोजी उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. निंभोरा येथे पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या आवार भिंतीचे बांधकाम करण्याकरिता ग्रामपंचायतने ठराव घेतला होता. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजना पशुसंवर्धन सन २०१५-१६ नुसार निविदा रक्कम ९,०३,१२६ अंदाजपत्रक दराने प्रशासकीय मान्यता मिळून तांत्रिक मंजुरी देण्यात आली होती; तसेच हे काम पूर्ण करण्याचा कालावधी ३१ मार्च २०१६ होता. सदर निधी हा ३१ मार्च २०१६ पूर्वी खर्च करावयाचा होता, त्यामुळे सदर काम विहीत मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक होते व मुदतवाढ मिळणार नाही, असे वर्कआॅर्डरमध्ये स्पष्टपणे नमूद होते. ते काम मुदतीत पूर्ण झाले नाही. त्या कामात भ्रष्टाचार झाल्याबाबत व अनियमितता चालू असल्याची तक्रार युवा सेना ता. अध्यक्ष संतोष भगत व उपसरपंच पद्माकर लांडे यांनी २ मे १६ ला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी व बांधकाम विभागाला दिली होती.त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. ३० मार्च २०१७ ला या बांधकामाबाबत गट ग्रामपंचायत निंभोराला ४,१७,७६० रुपयांचा धनादेश मिळाला. या धनादेशावर ८ मार्च २०१७ पासून १८० दिवसांच्या प्रसूती रजेवर गेलेल्या ग्रामसेविका आर.डी.तळवी यांनी ३० मार्च २०१७ रोजी स्वाक्षरी केली. वास्तविक पाहता तळवी सुटीवर असल्यामुळे निंभोरा ग्रामपंचायतचा प्रभार हा ३० मार्च रोजी गटविकास अधिकाऱ्यांनी आर.एस.गरकल यांच्याकडे सोपवला होता. तरीही तडवी यांनी ठेकेदार सावंग यांचे देयक काढण्यासाठी सुटीवर असतानाही स्वाक्षरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये अपहार झाल्याचा आरोप करून चौकशी करण्याची मागणी उपसरपंच पद्माकर लांडे व सदस्य मीना गावंडे, चंदा भुईभार, शोभा लांडे व संतोष भगत यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास १ मे रोजी उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी ग्रामसेवक आर.डी. तळवी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. ग्रामसेविका तडवी सध्या सुटीवर आहेत. त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला असता, त्या कॉल उचलत नाहीत. चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू.- गजानन वेले, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अकोला.