शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

सिद्धेश्‍वर देशमुख हत्याकांड; तीन आरोपींना दुहेरी जन्मठेप

By admin | Updated: February 28, 2017 02:04 IST

चौथ्या सात वर्ष शिक्षा; पाचवा आरोपी निर्दोष

अकोला, दि. २७- मलकापूरचे तत्कालीन सरपंच तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश्‍वर देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणातील तीन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच चौथ्या आरोपीस सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून पाचव्या आरोपीची संशयावरून निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणातील एका आरोपीस २५ हजार रुपये दंडही न्यायालयाने ठोठावला.मलकापूर ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच सिद्धेश्‍वर देशमुख हे त्यांचे मित्र डिगांबर पाटील आणि अनिल अदनकार यांच्यासोबत २३ ऑगस्ट २0१३ रोजी मलकापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर असताना त्यांच्यावर मोहन ऊर्फ बल्लू हरिभाऊ मार्कंड आणि नीलेश काळंके यांनी वाद घालत धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला होता. या हल्लय़ानंतरही सिद्धेश्‍वर देशमुख यांनी मारेकर्‍यांच्या हातातून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतर बल्लू मार्कंड याने देशमुख यांच्यावर चार गोळय़ा झाडल्या तर काळंकेने धारदार शस्त्रांनी हल्ला सुरूच ठेवला. यामध्ये सिद्धेश्‍वर देशमुख यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. या प्रकरणाची तक्रार अनिल रामभाऊ अदनकार यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी मोहन ऊर्फ बल्लू हरिभाऊ मार्कें ड, अविनाश सुरेश वानखडे, नीलेश काळंके, विष्णू नारायण डाबके आणि डिगांबर हरिभाऊ फाटकर, या पाच आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२, ३४१, १२0, ५0६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या हत्याकांडाचा तपास खदानचे तत्कालीन ठाणेदार शैलेश सपकाळ यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने १८ साक्षीदार तपासले. यामधील दोन प्रत्यक्षदश्री तर तीन अन्य साक्षीदार फितुर झाले; मात्र त्यानंतरही चारही आरोपींविरुद्ध आढळलेल्या ठोस पुराव्यावरून न्यायालयाने मोहन ऊर्फ बल्लू हरिभाऊ मार्कंड, नीलेश काळंके आणि अविनाश वानखडे या तीन आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर विष्णू नारायण डाबके याला सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. डिगांबर फाटकर याची संशयावरून निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणातील बल्लू मार्कंड याला २५ हजार रुपये दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ अँड. विनोद फाटे यांनी कामकाज पाहिले. तर आरोपीच्या वतीने औरंगाबाद येथील अँड. लढ्ढा यांनी कामकाज पाहिले.सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे २२ दाखलेसिद्धेश्‍वर देशमुख हत्याकांड प्रकरणात प्रत्यक्षदश्री आणि मुख्य साक्षीदार असलेले अनिल अदनकार आणि डिगांबर पाटील हे दोघेही फितूर झाले. यासोबतच आणखी तीन प्रमुख साक्षीदारही न्यायालयात फितूर झाले; मात्र त्यापूर्वी या प्रत्यक्षदश्री साक्षीदारांनी पोलीस आणि न्यायाधीशांसमोर साक्ष दिल्याचा मुद्दा जिल्हा सहायक सरकारी वकील अँड. विनोद फाटे यांनी न्यायालयात प्रभावीपणे मांडला. एवढेच नव्हे, तर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील अशा प्रकारच्या २२ प्रकरणांचे दाखले अँड. फाटे यांनी दिले. या २२ प्रकरणांच्या दाखल्यांवर आणि फाटे यांनी मांडलेली बाजू लक्षात घेता न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली.दोन आरोपी कारागृहात तर तीन जामिनावरया प्रकरणातील मोहन ऊर्फ बल्लू हरिभाऊ मार्कंड आणि नीलेश काळंके हे दोन्ही आरोपी गत तीन वर्षांपासून कारागृहात आहेत, तर विष्णू नारायण डाबके, डिगांबर हरिभाऊ फाटकर, अविनाश सुरेश वानखडे हे तीन आरोपी जामीनावर होते. फाटकर यांची निर्दोष मुक्तता झाली तर अन्य दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.देशमुख यांच्या पत्नीसह १८ साक्षीदारसिद्धेश्‍वर देशमुख हत्याकांड प्रकरणात त्यांची पत्नी विद्या देशमुख यांनी आरोपी आणि सिद्धेश्‍वर यांच्यात वाद होतअसल्याचे न्यायालयात सांगितले. आरोपींनी देशमुख यांना जिवे मारण्याची वारंवार धमकीही दिल्याचे विद्या यांनी सांगितले. यासोबतच फितूर न झालेले १३ साक्षीदार जबानीवर कायम राहिले. १३ साक्षीदार आणि विद्या यांनी सांगितलेला घटनाक्रम आरोपींचाफास आवळण्यात मदतीचा ठरला.न्यायालयात साक्षीदार फितूर झाले, त्यानंतरही या हत्याकांड प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून ठोसपणे बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाचे २२ दाखले दिले, तसेच सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडल्यानंतर आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली. - अँड. विनोद फाटेजिल्हा साहाय्यक सरकारी विधीज्ञ