शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

शुभमंगल सामुहिक विवाह योजनेतून १०८ जोडपी झाली विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 13:51 IST

अकोला:  शासनाच्यावतीने राबविण्यात येणाºया शुभमंगल सामुहिक विवाह योजनेतून अकोला जिल्ह्यातील १०८ जोडपी विवाहबद्ध झाली असून, या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये १० लाख ८०हजार रुपयाचा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.

ठळक मुद्देलाभार्थ्यांच्या  खात्यात १० लाख ८० हजार रुपये अनुदान जमा

अकोला:  शासनाच्यावतीने राबविण्यात येणाºया शुभमंगल सामुहिक विवाह योजनेतून अकोला जिल्ह्यातील १०८ जोडपी विवाहबद्ध झाली असून, या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये १० लाख ८०हजार रुपयाचा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.मुलींच्या किंवा मुलांच्या विवाहावर फार मोठा खर्च होतो. सामान्य शेतकरी किंवा गरीब कुटुंबांना हा खर्च परवडण्यासारखा नसतो. विवाहावरचा खर्च भागविण्यासाठी शेतकरी वर्ग सावकाराकडून कर्ज घेऊन कर्जबाजारी होतो. शेतकरी आत्महत्या करण्यामागे हे सुध्दा प्रमुख कारण आढळून आले आहे. या प्रश्नावर मातकरण्यासाठी तसेच शेतकरी, शेतमजूर यांचा विवाहवरचा खर्च वाचविण्यासाठी महिला व बालविकास विभागाद्वारे शुभमंगल सामुहिक विवाह योजना/नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तसेच कर्जबाजारीपणा वाढू नये म्हणून ही योजना सन २००८ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचीव्याप्ती शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आहे. या योजनेअंतर्गत सन २०१६-१७ मध्ये अमरावती विभागातील १५८३ लाभार्थ्यांना सामुहिक विवाह योजनेतून १ कोटी ७६ लाख ९६ हजार रुपये अनुदान महिला व बालविकास विभागाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील २४१  लाभार्थ्यांना २८ लक्ष ९२ हजार रुपये विवाह खर्च देण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील १६७ लाभार्थ्यांना २० लक्ष ४ हजार रुपये, बुलडाणा जिल्ह्यातील ९२५ लाभार्थ्यांना १ कोटी ११ लक्ष रुपये तर वाशिम जिल्ह्यातील १४२लाभार्थ्यांना १ लक्ष २० हजार रुपये विवाह खर्च अनुदान स्वरुपात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.

अशी आहे योजना  या योजने अंतर्गत सामुहिक विवाहात सहभागी होणाºया शेतकरी/शेतमजूर यांच्या मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे १० हजार रुपये एवढे अनुदान वधुच्या वडिलांच्या नावाने, वडिल हयात नसल्यास वधुच्या आईच्या नावाने व आई-वडिल दोन्हीही हयात नसल्यास वधुच्या नावाने धनादेश देण्यात येते. याशिवाय या योजनेंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करतात, त्यांनाही १०  हजार रुपये अनुदान देण्यात येते. सामुहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाकरिता संबंधित संस्थेस प्रति जोडपे दोन हजार एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान (विवाह नोदंणी शुल्कासह) विवाह योजनेसाठी देण्यात येते. 

टॅग्स :cultureसांस्कृतिक