शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र धारगड येथे शिवभक्तांनी केला महादेवाला जलाभिषेक

By admin | Updated: August 12, 2014 00:54 IST

शिवभक्तांनी गुफेमध्ये जाण्यापुर्वी धारगड येथे उंचावरुन पडणार्‍या पाण्याच्या धारेत स्नानकरीत भक्तीमय वातावरणात शिवलिंगाचे दर्शन घेतले.

आकोट : जयभोलेचा गजर करीत शिवभक्तांनी गुफेमध्ये जाण्यापुर्वी धारगड येथे उंचावरुन पडणार्‍या पाण्याच्या धारेत स्नानकरीत भक्तीमय वातावरणात शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी हर्र ऽ ऽ बोला महादेवाच्या गजराने श्रीक्षेत्र धारगड परिसर दुमदुमला होता. गतवर्षी पेक्षा यावर्षी शिवभक्तांची संख्या रोडवली असली तरी मात्र महीलांची गर्दी लक्षणीय होती. सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्रीक्षेत्र धारगड येथे श्रावणाच्या तिसर्‍या सोमवारी १0 व ११ ऑगस्टला यात्रा महोत्सव पार पडला. शिवभक्तांनी पूर्णा नदिवर जाऊन कावडीव्दारे जल आणले, तेथून पायदळ महादेवाचा गजर करीत डफाच्या तालावर श्रीक्षेत्र धारगड येथे पोहचून जलाभिषेक केला. या यात्रेमध्ये अकोला जिल्ह्यातील नव्हे तर आजूबाजूच्या अमरावती, वाशीम, बुलडाणा आदी जिल्ह्यातून शिवभक्तांनी हजेरी लावली होती. आकोट शहरात शिवभक्तांची रेलचेल दिसून आली. शिवभक्तांकरिता बसस्थानक मार्गावर ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी अल्पदरात चहापान, फराळाची व्यवस्था केली होती. आकोट आगारातून धारगड येथे जाण्याकरिता ज्यादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. बसेसव्दारे शिवभक्त अमोना पर्यंत पोहचले. तर काही खासगी वाहनांव्दारे पोपटखेड मार्गाने धारगडावर पोहचले. मंदिर परिसरात विविध संघटनांतर्फे महाप्रसादाची, फराळाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. धारगड सेवा समितीचे कार्यकर्ते भाविकांच्या सेवेत दिसून आले. मंदिर परिसरात पुजेचे साहित्य, प्रसादाची दुकाने थाटण्यात आली होती. धारगड दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर नरनाळा किल्ल्यावर हनुमान गढ सेवा समितीच्या महाप्रसादाचा लाभ शिवभक्तांनी घेतला. पोपटखेड मार्गे जातांना व येतांना नागोबा मंदिर येथे सराफ बाजार आकोट तर्फे आयोजित फराळ लाभ घेतला. धारगडावर अमोना मार्गे पायी जाणार्‍या भक्तांची अमोना येथे तपासणी करण्यात आली. पोपटखेड मार्गावर जाणार्‍या वाहनांचीसुद्धा वनविभागाच्या नाक्यावर, खटकाली टी पॉईंट आदी ठिकाणी तपासणी करण्यात आली. यावेळी अनेकांकडील मद्य, गुटखा पुड्या, माचीस, प्लॉस्टिक पिशव्या आदी जप्त करण्यात आल्या. यात्रेकरीता वन्यजीव व पोलीस,महसुल विभागाने यात्रा सुरळीत पार पाडली.