शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानाने केले १६ हेक्टरवर जलसंवर्धनाचे काम!

By admin | Updated: May 1, 2017 20:16 IST

अकोला : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील खडकाळ माळराणावर श्रमदानाने जलसंवर्धनाचे काम करण्यात आले. जलसंवर्धनाचे हे एक मॉडेल आहे.

श्रमदान: डॉ. पंदेकृवित महाराष्ट्रदिनी कामाचा शुभारंभअकोला : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील खडकाळ माळराणावर श्रमदानाने जलसंवर्धनाचे काम करण्यात आले. जलसंवर्धनाचे हे एक मॉडेल आहे. शेतकऱ्यांनी या जलसंवर्धन कामाची पाहणी केल्यास त्यांना त्यांच्या शेतावर या पद्धतीने जलसंवर्धनाची कामे करता येतील, असा विश्वास यावेळी या कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन १ मे रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात साजरा करण्यात आला. प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या मुख्य सोहळ्यात प्रभारी कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठातील सर्व सन्माननीय अधिष्ठाता, संचालक, सहयोगी अधिष्ठाता, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, विद्यापीठ अभियंता, नियंत्रक कुलसचिव, सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी आयोजित श्रमदान कार्यक्रमात सर्वच उपस्थितांनी सहभाग नोंदवत कीटकशास्त्र विभागासमोरील तब्बल १६ हेक्टर क्षेत्रावरील सलग समतल चरांच्या निर्मितीला हात घातला. असंख्य हातांच्या श्रमदानाने माळरान फुलून गेले. डॉ विलास भाले, संचालक संशोधन डॉ. दिलीप मानकर, विद्यापीठ अभियंता रामदास खोडकुंभे, विद्यापीठ नियंत्रक विद्या पवार, कुलसचिव डॉ. श्रीकांत अहेरकर, मध्यवर्ती संशोधन केंद्राचे संचालक डॉ. सेठी, जलतज्ज्ञ डॉ. सुभाष टाले यांच्यासह सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, डॉ.प्रकाश नागरे यांची उपस्थिती होती; तसेच महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती हे आजचे श्रमदानाचे वैशिष्ट्य होते. जवळपास दोन तास सर्वांनी श्रमदान करीत परिसराचा चेहरा मोहरा बदलविला, सोबतच स्वच्छता अभियानसुद्धा राबविण्यात आले.