शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

‘एसएमएस’ दाखवा, वीज बिल भरा!

By admin | Updated: July 6, 2017 01:34 IST

महावितरणची ‘पेपरलेस’कडे वाटचाल : वीज ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वीज ग्राहकांना सर्व सेवा आॅनलाइन पुरविण्यावर भर देत असलेल्या महावितरणने वीज बिलासंदर्भातही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वीज बिलाबाबत महावितरणच्यावतीने ग्राहकांना मोबाइलवर देण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने राज्यभरातील ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. वीज देयक न मिळण्याच्या वाढत्या समस्यांवर उपाय म्हणून घेण्यात आलेला हा निर्णय म्हणजे महावितरणचे ‘पेपरलेस’ व्यवहाराच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.वीज ग्राहकांना विविध सुविधा आॅनलाइन देण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून महावितरणकडून वीज बिलाची माहिती व इतर सुविधा मोबाइलवर देण्यात येत आहेत. राज्यभरातील सुमारे १ कोटी ३९ लाख वीज ग्राहकांनी आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. या ग्राहकांना महावितरणच्या वीज बिलाचा तपशील एसएमएसद्वारे संबंधित मोबाइलवर पाठविण्यात येतो. या एसएमएसमध्ये ग्राहक क्रमांक, वीज बिलाची रक्कम तसेच वीज बिल भरण्याची अंतिम तारीख याचा समावेश असतो. राज्यभरातील अशा ग्राहकांना आता मोबाइलवरील एसएमएस दाखवून महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रात वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा महावितरणचा प्रयत्न असून, एसएमएसद्वारे ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार महावितरणने ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. मोबाईल क्रमाकांची नोंदणी करा ! वीज ग्राहकांनी मोबाइल क्रमांक नोंदविण्यासाठी मोबाइलमध्ये ‘एमआरईजी’ हा शब्द कॅपिटलमध्ये टाइप करून स्पेस देऊन आपला बारा आकडी ग्राहक क्रमांक टाकावा व ९२२५५९२२५५ या क्रमांकावर पाठवून द्यावा, तसेच १८००२३३३४३५/१८००२००३४३५ व १९१२ या टोल फ्री क्रमांकावरही नोंदणी करता येते. महावितरणचे संकेतस्थळ,. मोबाइल अ‍ॅपवरही नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.जिल्ह्यात दीड लाख ग्राहकांनी केली नोंदणीमहावितरणचे मोबाइल अ‍ॅप डाउनलोड केलेल्या ग्राहकांसाठीही मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे गरजेचे आहे. यामुळे मोबाइल क्रमांकांची नोंदणी करण्याकडे वीज ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. अकोला परिमंडळांतर्गत अकोला जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार वीज ग्राहकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे.