शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘बीडीओं’ना कारणे दाखवा नोटिस

By admin | Updated: May 27, 2017 00:55 IST

लेखा परीक्षणास ग्रामपंचायतींचे अभिलेखे देण्यात दिरंगाई!

संतोश येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ग्रामपंचायतींच्या निधीचे अभिलेखे लेखा परीक्षणास उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने, यासंदर्भात अनुपालन अहवाल सादर करण्याच्या कामात दिरंगाई केल्यामुळे जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.लेखा परीक्षणासाठी जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतींकडून ग्रामपंचायत अभिलेखे, सामान्य निधी व अन्य निधीचे अभिलेखे उपलब्ध करून देण्यात आले नाही. यासंदर्भात सन २०११-१२ मध्ये पंचायत राज समितीने आक्षेप नोंदविला होता. या पृष्ठभूमीवर योजनानिहाय ग्रामपंचायतींच्या सामान्य निधी, जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना तसेच संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनासंबंधी सद्यस्थितीचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) देण्यात आले होते. वारंवार निर्देश देण्यात आल्यानंतर अद्यापही ‘बीडीओं’कडून अनुपालन प्राप्त झाले नाही. एवढेच नाही तर जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांकडून लेखा परीक्षणासाठी ग्रामपंचायत अभिलेखे अद्यापही उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यानुषंगाने लेखा परीक्षणासाठी ग्रामपंचायतींची अभिलेखे उपलब्ध करून न देणे आणि यासंदर्भात अनुपालन अहवाल सादर करण्याच्या कामात जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुहे यासंदर्भात नियम १९७९ नुसार शिस्तभंगविषयक कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटिस जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी गत ११ मे रोजी जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना बजावली आहे. नोटिस मिळाल्यानंतर तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेशही नोटिसमध्ये देण्यात आला आहे.लेखा परीक्षणासाठी अद्यापही अभिलेखे न दिलेल्या अशा आहेत ग्रामपंचायती!लेखा परीक्षणासाठी जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींंच्या ग्रामसेवकांकडून अद्यापही अभिलेखे उपलब्ध करून दिले नाही. त्यामध्ये दुधाळा, कौलखेड जहागीर, कंचनपूर, शिवणी, लोणाग्रा, धामणा, चिखलगाव, कापशी, रिधोरा, दधम, बारलिंगा, जोगलखेड, मनारखेड, खामखेड, खिरपुरी खुर्द, जलालाबाद, भेंडीसूत्रक, खेर्डा, वडगाव, जामवसू, बोर्टा, लोणसना, शेलू नजीक, दातवी, विरवाडा, कवठा सोपीनाथ, निंभा, कंझरा, शेकापूर,गावंडगाव, सिरसोली व शिवाजी नगर (तेल्हारा) इत्यादी ग्रामपंचायतींच्या संबंधित ग्रामसेवकांकडून लेखा परीक्षणासाठी अभिलेखे उपलब्ध करून देण्यात आले नाही.लेखा परीक्षणासाठी ग्रामपंचायतींची अभिलेखे उपलब्ध करून देण्यात आली नाही आणि यासंदर्भात अनुपालन अहवाल सादर करण्याच्या कामात दिरंगाई केल्याने, जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या ‘बीडीओं’ना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली असून, तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. स्पष्टीकरण समाधानकारक प्राप्त न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.- डॉ. सुभाष पवारप्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद