शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम नगरपरिषदेच्या सर्वच पर्यवेक्षकांना ‘कारणे दाखवा’!

By admin | Updated: January 20, 2016 01:58 IST

भाडोत्री सफाई कामगार प्रकरणात येत्या दोन दिवसांत खुलासा सादर करण्याच्या सूचना.

वाशिम : सरकारकडून गलेलठ्ठ पगार घ्यायचा, त्यापैकी अतिशय नगण्य रक्कम एखाद्या भाडोत्री व्यक्तीला देऊन त्यांच्याकडून स्वत:चे काम करून घेणार्‍या सफाई कामगारांबाबत १६ जानेवारी रोजी 'लोकमत'ने स्टिंग ऑपरेशन केले होते. यासंदर्भात शहरात असलेल्या आरोग्य विभागातील सर्वच्या सर्व पर्यवेक्षकांना (जमादार) नगरपरिषदेच्यावतीने १९ जानेवारी रोजी सकाळी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.नगरपरिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत शहराच्या स्वच्छतेसाठी असलेल्या सफाई कामगारांनी स्वत: कामावर न जाता त्यांच्या जागी भाडोत्री व्यक्तींची नेमणूक केली असल्याचे ह्यलोकमतह्णने १६ जानेवारी रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणाच्या चौकशीस प्रारंभ झाला असून, संबधित अधिकार्‍यांच्यावतीने माहिती संकलित करणे सुरू झाले आहे. यासंदर्भात शहरातील नरेंद्र नागपूरकर, बबन भांदुर्गे, दशरथ मोहळे, लक्ष्मण बढे, सुनील कनोसे, लाला मांजरे या सर्व सहा पर्यवेक्षकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली तसेच या प्रकरणात येत्या दोन दिवसांत खुलासा सादर करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक जितू बढेल यांनी दिली. सदर प्रकरण गंभीर असल्याने नगरपरिषदेचे उपाध्यक्ष मो. जावेद हाजी मो. हारुण यांनी ताबडतोब दखल घेत आरोग्य विभागाला धारेवर धरले तसेच यासंदर्भात १९ जानेवारी रोजी शहरातील सर्व सफाई कामगारांच्या पर्यवेक्षकांना बोलावून त्यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा केल्यानंतर या प्रकरणात कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना केल्यात. यावेळी आरोग्य निरीक्षक आर.एस. महाले, स्वच्छता निरीक्षक जितू बढेल, पर्यवेक्षक नरेंद्र नागपूरकर, बबन भांदुर्गे, दशरथ मोहळे, लक्ष्मण बढे, सुनिल कनोसे, लाला मांजरे यांच्यासह कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनीसुद्धा प्रकरण गांभीर्याने घेतल्याने आरोग्य विभागातील अनेक अधिकारी, पर्यवेक्षकासह सफाई कर्मचार्‍यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.