शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खाटा कमी; बाळंतीण महिला मात्र जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 01:16 IST

अकोला : जिल्हय़ात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून, सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांडच होत असल्याचे चित्र आहे. येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाचीही परिस्थिती वेगळी नसून, या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणार्‍या गरोदर महिला आणि उपलब्ध खाटा यांचे प्रमाण व्यस्त आहे. रुग्णालयात खाटांची संख्या ३00 आहे, तर त्या तुलनेत ३५0 ते ३७0 गरोदर महिला दाखल होतात. परिणामी दाखल होणार्‍या उर्वरित गरोदर महिलांची या ठिकाणी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्हा स्त्री रुग्णालय रिक्त पदांचा रुग्णसेवेत खोडा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून, सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांडच होत असल्याचे चित्र आहे. येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाचीही परिस्थिती वेगळी नसून, या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणार्‍या गरोदर महिला आणि उपलब्ध खाटा यांचे प्रमाण व्यस्त आहे. रुग्णालयात खाटांची संख्या ३00 आहे, तर त्या तुलनेत ३५0 ते ३७0 गरोदर महिला दाखल होतात. परिणामी दाखल होणार्‍या उर्वरित गरोदर महिलांची या ठिकाणी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.पूर्वाश्रमीचे लेडी हार्डिंग रुग्णालयाचे नामकरण आता जिल्हा स्त्री रुग्णालय झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत या रुग्णालयातील खाटांची व कक्षांची संख्या वाढली असून, सूश्रुषेचा दर्जाही सुधारला आहे. त्यामुळे जिल्हाभरातून प्रसूतीसाठी येणार्‍या गरोदर महिलांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. वर्ष २00९-१0 मध्ये या रुग्णालयात १0 हजार महिलांचे बाळंतपण व्हायचे, आता ही संख्या १७ हजारांच्या घरात गेली आहे. त्या तुलनेत येथील पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली नाही. रुग्णालयात आठ कक्ष, दोन प्रसूती कक्ष, कुपोषित बालकांसाठी एक कक्ष आणि विशेष नवजात शिशू दक्षता केंद्र आहे. रुग्णालयाची क्षमता ३00 खाटांची आहे; परंतु येथे दररोज ३५0 ते ४00 पर्यंंत महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. त्यामुळे अतिरिक्त महिलांना खाटा उपलब्ध होऊ शकत नाहीत. जिल्हाभरातील महिलांसाठी असलेल्या या रुग्णालयात अनेक पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचे दिसून येत आहे. या रुग्णालयात डॉक्टरपासून ते परिचारिका व सफाई कामगारांपर्यंतची ४४ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरल्यास रुग्णसेवेचा दर्जा वाढण्यास मदतच होईल. 

नवीन वास्तूचे काम प्रगतिपथावरजिल्हा स्त्री रुग्णालायाचा विस्तार होणार असून, आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या परिसरात नवीन वास्तूचे काम सुरू आहे. त्यामध्ये २0 खाटांचे नवीन केंद्र सुरू होणार आहे. नवीन इमारत उपलब्ध झाल्यानंतर ही समस्या दूर होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.