शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिनेट निवडणुकीसाठी अकोल्यात अल्प मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:31 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रविवारी  सिनेट निवडणुकीसाठी रालतो विज्ञान महाविद्यालयासह अकोट,  पातूर येथील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क  बजावला. सिनेट निवडणुकीसाठी अकोल्यात अल्प म्हणजे  केवळ ३९ टक्केच मतदान झाले.

ठळक मुद्दे३५ उमेदवार पदवीधर मतदारसंघात केवळ ९११ मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रविवारी  सिनेट निवडणुकीसाठी रालतो विज्ञान महाविद्यालयासह अकोट,  पातूर येथील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क  बजावला. सिनेट निवडणुकीसाठी अकोल्यात अल्प म्हणजे  केवळ ३९ टक्केच मतदान झाले. पदवीधर मतदारसंघात तर  सर्वात कमी ३१ टक्केच मतदान झाले. १७ ऑक्टोबर रोजी  अमरावती विद्यापीठात मतमोजणी आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सिनेट, विद्वत,  अभ्यास मंडळ आदी प्राधिकारणीवर प्रतिनिधित्व मिळावे,  यासाठी प्राचार्य मतदारसंघ, शिक्षण संस्था, शिक्षक मतदारसंघ,  नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघ, अभ्यास मंडळ मतदारसंघामध्ये  एकूण २0५ उमेदवार उभे ठाकले होते. रविवार १५ ऑक्टोबर  रोजी पाचही जिल्हय़ामधील ६७ मतदान केंद्रांवर मतदानाची  प्रक्रिया पार पडली. सिनेट निवडणुकीसाठी अकोला, अमरावती, बुलडाणा, यव तमाळ आणि वाशिम जिल्हय़ामधून १६ हजारावर पदवीधरांनी  नोंदणी केली होती. ३३९१ मतदारांपैकी १३00 मतदारांनी म तदान केले. उमेदवारांनी काही दिवसांपासून पाचही म तदारसंघामध्ये प्रचाराची धूम सुरू होती. सर्वाधिक चुरस ही  पदवीधर मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली. पदवीधर म तदारसंघामध्ये सर्वात जास्त उमेदवार रिंगणात उभे ठाकले होते.  त्याखालोखाल शिक्षक मतदारसंघात उमेदवार उभे होते. रविवारी  रालतो विज्ञान महाविद्यालयामध्ये शांततेत मतदानाची प्रक्रिया पार  पडली. मतदारांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.  अकोला जिल्हय़ातून प्राचार्य मतदारसंघ, शिक्षण संस्था, शिक्षक  मतदारसंघ, नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघ, अभ्यास मंडळ म तदारसंघामध्ये एकूण ३५ उमेदवार उभे होते. मतदान केंद्र प्रमुख म्हणून रालतो विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. विजय नानोटी, मतदान अधिकारी म्हणून विक्रांत मालविया,  अनिल घोम यांनी काम पाहिले. 

‘या’ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत सीलबंदप्राचार्य मतदारसंघ, शिक्षण संस्था, शिक्षक मतदार संघ,  नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघ, अभ्यास मंडळ मतदारसंघामध्ये  अकोल्यातील डॉ. श्रीप्रभू चापके, डॉ. मधुकर पवार, डॉ.  अंबादास कुलट, डॉ. जगदीश साबू, डॉ. संतोष ठाकरे, संस्था  प्रतिनिधी गटातून तुळशीदास मिरगे, डॉ. ज्ञानदेव इंगळे, डॉ. मम ता इंगोले, प्रा. विवेक हिवरे, रवींद्र मुंडरे, डॉ. डी.ई. उंबरकर,  अनिता काळमेघ, प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, संजय देशमुख, उमेश  कुळमेथे, समीर गडकरी, गजानन मानकर, रवींद्र तायडे, प्रदीप  थोरात, अनिता चोरे, विवेक बोचे, श्रीकांत सातारकर, डॉ. मुकुंद  इंगळे, डॉ. राजकुमार राठोड, श्रीकृष्ण काकडे, संतोष ठाकरे,  डॉ. किरण खंडारे, डॉ. किसन मेहरे, भास्कर पाटील, मो.  अमजद काझी, डॉ. किशोर देशमुख, डॉ. प्रशांत कोथे, डॉ.  आनंद काळे, डॉ. बंडू किर्दक, संध्या काळे आदी उमेदवारांचे  भाग्य रविवारी मतपेटीत सीलबंद करण्यात आले.

टॅग्स :universityविद्यापीठ