शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

थार येथे शॉर्ट सर्किटने आग

By admin | Updated: April 24, 2017 01:53 IST

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील थारनजीक असलेल्या एमआयडीसीजवळ रस्त्याच्या कडेला शेतामध्ये दुपारी ४ वाजताच्या दरम्यान आग लागली. परिसरातील गव्हाचे पीक बचावले.

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील थारनजीक असलेल्या एमआयडीसीजवळ रस्त्याच्या कडेला शेतामध्ये दुपारी ४ वाजताच्या दरम्यान आग लागली. परिसरातील गव्हाचे पीक बचावले.तेल्हारा-आडसूळ मार्गावर एमआयडीसीनजीक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्याच्या पऱ्हाट्यांच्या गंजीने पेट घेतला. हवेमुळे आगीचे लोट तेल्हारा-आडसूळ मुख्य रस्त्यावर आले होते. त्यामुळे काही काळ वाहतूक वळविण्यात आली होती. गावातील नागरिकांनी तेल्हारा न. प.च्या नगराध्यक्ष जयश्री पुंडकर यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली असता, त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पाठविली व आग आटोक्यात आली, त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांच्या गव्हाचे पीक बचावले. या ठिकाणी अनेक वेळा शॉर्ट सर्किटमुळे आगी लागल्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. महावितरणने येथील कामाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गांडूळ प्रकल्प शेडला आगअकोट तालुक्यातील वणी वारुळा येथे गावालगत असलेल्या मळ्यातील गांडूळ प्रकल्पाच्या शेडला २३ एप्रिल रोजी दुपारी अचानक आग लागली. यामध्ये अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने मोठी हानी टळली. वणी वारुळा गावालगत भागीरथ पोटे यांच्या मळ्यातील गांडूळ प्रकल्पाचे शेड व आजूबाजूला ठेवलेल्या इंधनाला अचानक आग लागली. विद्युत पुरवठा बंद असल्याने आग विझविण्यास अडचणी निर्माण झाल्या. तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर आग विझविण्यात आली. त्यामुळे मळ्यातील सहा एकरांतील लिंबूची झाडे व गावालगतची घरे आगीपासून वाचली. घटनास्थळावर तलाठी नरेश रतन यांनी पंचनामा केला. घटनेची माहिती तहसीलदार व पोलीस स्टेशनला देण्यात आली.