शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे ‘ढोल वाजवा’आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 01:30 IST

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जिल्हा प्रमुखांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्यांवरून संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या आकडेवारीबाबत सर्वत्र गोंधळाची स्थिती आहे. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आग्रही असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हा बँकांसमोर ‘ढोल वाजवा’आंदोलन छेडण्याचा आदेश गुरुवारी जिल्हाप्रमुखांना दिला. राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचे निकष, दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी व राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे उपलब्ध असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या यादीवरून राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून संभ्रमाची परिस्थिती आहे. याविषयी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, स्थानिक राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँकांसह अग्रणी बँकेकडे पात्र शेतकऱ्यांची नेमकी यादी कोणती यासंदर्भात आढावा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सेना जिल्हाप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केले होते. जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी अग्रणी बँकेने दिलेली यादी पक्षप्रमुखांकडे सादर केली. एकूणच राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांच्या आकडेवारीवरून खुद्द बँकांकडे माहिती उपलब्ध नसल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आले. ही कोंडी फोडून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी येत्या १० जुलैपासून जिल्हा बँकांसमोर ‘ढोल वाजवा’ आंदोलन छेडण्याचा आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिला आहे. जिल्ह्यातील बँकांनी यापूर्वी एक-एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम अदा केली असताना, यंदा पात्र शेतकऱ्यांच्या संख्येत घसरण झाली कशी,असा प्रश्न उपस्थित होतो. बँकांकडे शेतकऱ्यांची अचूक आकडेवारी का उपलब्ध नाही. एकूणच पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ न देण्याचे कटकारस्थान दिसून येते. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार जिल्हा बँकेसमोर १० जुलैपासून आंदोलनाची सुरुवात केली जाईल. -नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना