डॉ. किरण वाघमारे /अकोलाएकेकाळी निष्ठावान शिवसैनिकांची मानली जाणारी शिवसेना आज जिल्ह्यातून हद्दपार होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. १९९0 पासून सत्ता कोणाचीही असो, अकोल्यातून शिवसेनेचा आमदार निवडून गेला नाही, असे कधीच झाले नाही. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मात्र अकोल्यात शिवसेनेचा सफाया झाला. पाचही म तदारसंघांमध्ये उमेदवार स्पर्धेतच नव्हते, अशी दुर्दशा शिवसेनेची झाली. त्यामुळे बाळासाहेबांच्या आदेशाने शिवसैनिकांनी कष्टपूर्वक उभी केलेली शिवसेना अकोला जिल्ह्यात कोमात गेल्याचेच चित्र सध्या आहे. विदर्भात सर्वात प्रथम शिवसेनेची जडणघडण अकोला परिसरातच झाली. अकोल्यातील काँग्रेसच्या गडाला शिवसेनेने आपल्या संघटनाच्या बळावर खिंडार पाडले. तरुणांना आ पल्याकडे ओढून शिवसेनेची संघटन बांधणी अतिशय जबरदस्त करण्यात आली होती. १९९0 पासून तर शिवसेनेला अकोला जिल्ह्यात सोनेरी दिवस आले. शिवसेनेचे तीन आमदार जिल्ह्यात निवडून आले. यानंतरच्या निवडणुकीत कधी दोन, तर कधी एक असे सा तत्याने शिवसेनेचे आमदार निवडून येत राहिले. मागील निवडणुकीत शिवसेनेचा एक आमदार होता. यंदाच्या निवडणुकीत ही एक जागादेखील शिवसेनेला गमवावी लागली. विशेष म्हणजे, यावेळी भाजपसोबत युती न करता शिवसेना स्वतंत्र लढली. तथापि, आ. गो पीकिशन बाजोरिया वगळता एकाही मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला अनामत रक्कम वाचविता आली नाही. शिवसेनेचे हे सर्वांत मोठे पतन होय.
शिवसेनेत ‘सैनिकां’चे स्थान कुठे?
By admin | Updated: October 28, 2014 00:51 IST