शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

टाळ-मृदंगाच्या गजराने व हरिनामाच्या जयघोषाने शिवरनगरी दुमदुमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:14 IST

अकोला : जिल्ह्यातील जागृत आदर्श ग्राम शिवर येथील श्री दुर्गादेवी संस्थानचा २९ वा वर्धापनदिन उत्सव सोहळा उत्साहात पार पडला. ...

अकोला : जिल्ह्यातील जागृत आदर्श ग्राम शिवर येथील श्री दुर्गादेवी संस्थानचा २९ वा वर्धापनदिन उत्सव सोहळा उत्साहात पार पडला. टाळ-मृदंगाच्या गजराने व हरिनामाच्या जयघोषाने शिवर नगरी दुमदुमून गेली होती.

सप्ताहाचा समारोप तुकाराम महाराज सखारामपूरकर यांच्या काल्याच्या हरिकीर्तनाने करण्यात आला. याप्रसंगी बोलताना महाराजांनी श्री दुर्गादेवी संस्थानच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले व संस्थानला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शासनाने दिलेल्या कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून वर्धापनदिन उत्सव सोहळा यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी काैतुक केले.

विदर्भातील पाळोदी येथील भागवताचार्य राजेंद्र महाराज वक्टे यांच्या मधुर वाणीतून ३१ डिसेंबर २०२० ते ७ जानेवारी २०२१ या कालावधीत श्रीमद‌्भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विदर्भातील नामवंत हरिकीर्तनकार महाराजांची समाजप्रबोधन हरिकीर्तने तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी श्री दुर्गादेवी संस्थानचे अध्यक्ष जगदीश मुरूमकार यांनी संस्थानच्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती दिली. शासनाने कोरोनासंदर्भात दिलेल्या नियमावलीचे पालन करून श्री दुर्गादेवी संस्थानचा वर्धापनदिन उत्सव सोहळा पार पडला.

---------------

भागवत ग्रंथाची नगरप्रदक्षिणा

७ जानेवारीला माउली हरिपाठ मंडळ शिवर यांच्या नेतृत्वात श्रीमद‌्भागवत ग्रंथाची गावातून भव्य नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी गावातील प्रत्येक चौकात आकर्षक रांगोळ्या काढून श्रीमद‌्भागवत ग्रंथाचे पूजन करण्यात आले. यावेळी आयोजित महाप्रसादाचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.