शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

हजारोंच्या साक्षीने झाला शिव-पार्वतीचा विवाह

By admin | Updated: April 4, 2017 01:30 IST

लहान उमरी येथील प्राचीन शिवमंदिरात सोमवारी रात्री आठ वाजता अनेक वर्षांच्या परंपरागत पद्धतीने शिव-पार्वतीचा विवाह सोहळा पार पडला.

अकोला: स्थानिक लहान उमरी येथील प्राचीन शिवमंदिरात सोमवारी रात्री आठ वाजता अनेक वर्षांच्या परंपरागत पद्धतीने शिव-पार्वतीचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला हजारो अकोलेकरांनी विशेष हजेरी लावली. या विवाह सोहळ््याच्या निमित्ताने लहान उमरी परिसरातील शिवमंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.लग्न सोहळ््याप्रमाणे शिव आणि पार्वतीच्या पिंडीला सजविण्यात आले. वाजंत्री, वऱ्हाडी आणि मंगलाष्टकानंतर अक्षता टाकून हा विवाह पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही महादेवाच्या या आगळा-वेगळा लग्न सोहळ््याला पाहण्यासाठी दूरदूरून लोक आले होते. त्यानिमित्ताने मंदिराभोवती लघुव्यवसायिकांनी खेळणी आणि जत्रेसारखी दुकाने थाटले होते. उमरी उमरखेडवासीयांचे महादेव संस्थान परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षीच्या चैत्र शुद्ध अष्टमीच्या या मुहूर्तावर लग्न सोहळ्यानिमित्त येथे यात्रेचे स्वरूप येते. ही प्रथा गेल्या पन्नास वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे सोमवारी सकाळी महादेवाचे पूजन, ग्रंथपठण, महिलांचे भजन, सामुदायिक प्रार्थना, लग्नाची मिरवणूक काढून आणि रात्री विवाह सोहळा पार पडला. मंगळवारी या परिसरात दहीहंडी आणि महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. लग्न सोहळा आणि यात्रेच्या यशस्वीतेसाठी महादेव संस्थानचे अध्यक्ष उमेश मसने, प्रशांत धनोकार, डॉ. मधुकर शेगोकार, जयंत मसने, डॉ. संतोष हुसे, अरुण काळे, संतोष वाढोकार, गंगाधर नावकार, विजय सारभुकन, ओंकार डोके व आकाश सायखेडे आदींनी अथक परिश्रम घेतलेत.