शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेला कानमंत्र

By admin | Updated: January 7, 2017 02:34 IST

अकोला मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर मुंबईत शिवसेनेची बैठक.

अकोला, दि. ६- महापालिकेच्या निवडणुकीत गाफील न राहता पदाधिकार्‍यांनी पक्षाच्या प्रामाणिक, सक्षम व निष्ठावान कार्यकर्त्यांंना उमेदवारी देण्याचा कानमंत्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मुंबई येथे रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर ज्या मनपा क्षेत्रात निवडणुका होतील त्या ठिकाणच्या जिल्हाप्रमुखांना निवडणुकीच्या संदर्भात पक्षप्रमुखांनी कानमंत्र दिल्याची माहिती आहे. राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसह महापालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर मुंबईत शिवसेनेच्यावतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आढावा बैठकीपूर्वी शिवसेनेच्या राज्यभरातील संपर्क प्रमुखांनी पक्षाची जिल्हानिहाय माहिती सादर केल्याचे बोलल्या जात आहे. यामध्ये नगरपालिका निवडणुकीचा निकाल व पदाधिकार्‍यांच्या कामकाजाचादेखील समावेश होता. ५ जानेवारी रोजी रंगशारदा सभागृहात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षाची वाटचाल कशी राहील, या विषयावर पदाधिकार्‍यांना संबोधित केले. महाराष्ट्रात ज्यांना बोट धरून चालविण्यास शिकविले त्यांनीच कालांतराने शिवसेनेचा कसा घात केला, यावर पक्ष प्रमुखांनी नैसर्गिक मित्र पक्षाला चिमटे काढले. २0१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत युतीच्या मुद्यावरून निर्माण झालेला शिमगा कसा विसरता येईल, असे सांगत जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या निवडणुकीत गाफील न राहता पदाधिकार्‍यांनी प्रामाणिकपणे कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. युतीच्या मुद्यावर संभ्रमावस्थाशिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनी तातडीने बोलावलेल्या आढावा बैठकीला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाज पसोबत युती करणार किंवा नाही, यासंदर्भात पक्ष प्रमुख संकेत देतील, अशी पदाधिकार्‍यांना अपेक्षा होती. तसे कोणतेही संकेत उद्धव ठाकरे यांनी न दिल्यामुळे युतीच्या मुद्यावर संभ्रमावस्था कायम असल्याचे चित्र आहे.दबावतंत्र झुगारा!महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी पक्षाच्या निष्ठावान, प्रामाणिक व सक्षम कार्यकर्त्यांंना उमेदवारी देण्याकडे लक्ष द्या. केवळ दुकानदारीचे उद्दिष्ट समोर ठेवून मर्जी तल्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी पक्षावर दबावतंत्राचा वापर करणार्‍यांना थारा देऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.