शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचे मोबाइल टॉवरवर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 12:10 IST

शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले यांचे पती अश्वीन नवले यांच्यासह संदीप बोरसे, करण घाटे, महादेव श्रीनाथ, सतीश देशमुख, संदीप महल्ले यांनी शुक्रवारी मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील शिवसेना वसाहतमध्ये गत दोन वर्षांपासून पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन खोदून ठेवली असली तरी अद्यापही सदर काम अर्धवट स्थितीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले यांचे पती अश्वीन नवले यांच्यासह संदीप बोरसे, करण घाटे, महादेव श्रीनाथ, सतीश देशमुख, संदीप महल्ले यांनी शुक्रवारी मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. यावेळी मनपा अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.‘अमृत’ अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक १८ पाणीपुरवठयासाठी जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात आहे. प्रभागातील गीता नगर व इतर भागात जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असले तरी शिवसेना वसाहतमध्ये मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले काम अद्यापही निकाली निघाले नसल्याची परिस्थिती आहे. दोन वर्षांपूर्वी संबंधित कंत्राटदाराने जलवाहिनीसाठी ठिकठिकाणी रस्त्याचे खोदकाम करून ठेवले असून, अद्यापही जलवाहिनीचे जाळे टाकले नाही. योजनेचे काम निकषानुसार होत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. जलवाहिनीचे काम निकषानुसार आणि तातडीने निकाली काढण्याची मागणी करीत प्रभागाच्या नगरसेविका सपना नवले यांचे पती अश्विन नवले यांच्यासह शिवसैनिकांनी शुक्रवारी शोले स्टाइल आंदोलन करीत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला.दरम्यान, जलवाहिनीच्या कामासंदर्भात मनपाने लेखी आश्वासन द्यावे, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, नगरसेवक गजानन चव्हाण यांनी उपस्थित उपायुक्त वैभव आवारे यांच्यासोबत शिष्टाई केल्यानंतर प्रशासनाने लेखी हमी दिली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAkolaअकोला