शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने वाजविले ‘ढोल’

By admin | Updated: July 11, 2017 01:35 IST

घरकुलांसाठी मनपावर मोर्चा : शिवसेनेच्या आंदोलनामुळे गाजला सोमवार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना विनाअट त्वरित पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासोबतच संबंधित शेतकऱ्यांची यादी तातडीने प्रसिद्ध करून देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात आले. त्यापूर्वी पंतप्रधान आवास योजनेचे निकष व अटी शिथिल करून पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी महापालिकेवर मोर्चा काढला. एकूणच, शिवसेनेच्या आंदोलनांमुळे सोमवारचा दिवस ढवळून निघाला. दोन्ही मोर्चादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांच्यावतीने शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती मिळावी, यासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेने कर्जमाफीच्या विषयावरून आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपाने जाहीर केलेली शेतकऱ्यांची यादी व जिल्हा बँकांकडील यादीत मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा आरोप करीत शिवसेनेने बँकांसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलनाचे हत्यार उपसले. बँकांसमोर आंदोलन करण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. सोमवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रत्येक तालुक्यातून दिंडी व भगवे झेंडे घेऊन शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. दीड लाखांच्या कर्जमाफीसाठी जिल्हा बँकेचे १९ हजार ८५३ शेतकरी पात्र ठरले असून, त्यांचे ७ कोटी रुपये माफ होतील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांना शिवसेनेच्यावतीने निवेदन सोपविण्यात आले. बँक अधिकारी म्हणाले, आदेश नाहीत!ल्ल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांनी सन २००९ पासून थकबाकीदार असलेल्या सभासदांना पात्र ठरविण्यासंदर्भातील शासन निर्णय अद्यापही मिळाला नसल्याचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना सांगितले. शासन निर्णय प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी स्पष्टीकरण अनंत वैद्य यांनी शिवसैनिकांना दिले.अशा आहेत मागण्या- कर्जमाफीसठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी सादर करा- कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना विनाअट पीक कर्ज उपलब्ध करून द्या.- शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली तत्काळ थांबवा.- बँकेमार्फत पीक कर्ज घेतलेल्या कर्जदार शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करा- पीक कर्जाव्यतिरिक्त शेतकऱ्यांकडे मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज आहे. अशा शेतकऱ्यांची यादी द्या.