शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांची विदर्भवाद्यांना धक्काबुक्की

By admin | Updated: May 1, 2017 20:51 IST

अकोला:महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत वेगळ््या विदर्भाची मागणी करणाऱ्या विदर्भवाद्यांच्या आंदोलनात शिवसैनिकांनी प्रचंड धुडगूस घालून आंदोलन उधळून लावले.

विदर्भवाद्यांचे आंदोलन शिवसैनिकांनी उधळले;पोलिसांची धावअकोला:महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत वेगळ््या विदर्भाची मागणी करणाऱ्या विदर्भवाद्यांच्या आंदोलनात शिवसैनिकांनी प्रचंड धुडगूस घालून आंदोलन उधळून लावले. स्थानिक मदनलाल धिंग्रा चौकात ब्रजलाल बियाणी यांच्या पुतळयाला पुष्पहार घालून वेगळ््या विदर्भाचे नारे देणाऱ्या विदर्भवाद्यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की करत विदर्भाच्या झेंड्याची होळी केल्याचा प्रकार सोमवारी घडला. सिटी क ोतवाली पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळल्याचे चित्र पहावयास मिळाले. राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना शहरातील विदर्भवाद्यांनी वेगळ््या विदर्भाच्या मागणीसाठी मदनलाल धिंग्रा चौकात आंदोलन केले. विदर्भवादी अविनाश नाकट यांनी ब्रिजलाल बियाणी यांच्या पुतळ््याला पुष्पहार घातला. यावेळी धनंजय मिश्रा, मनोज तायडे, प्रशांत गावंडे, ललित बहाळे, डॉ.निलेश पाटील व उपस्थित कार्यकर्ते वेगळ््या विदर्भाची नारेबाजी करत असताना या आंदोलनाची कुणकूण लागलेल्या शिवसैनिकांनी धिंग्रा चौकात धाव घेतली. शिवसेना निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, अश्वीन नवले, तरूण बगेरे, योगेश गिते, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, दिनेश सरोदे, राहूल कराळे, अश्विन पांडे, कालू गायकवाड, संतोष रणपिसे, बाळापूर तालुका प्रमुख संजय शेळके, रूपेश ढोरे, संजय भांबेरे, योगेश बकाल, प्रकाश वानखडे, संजय अग्रवाल, चेतन मारवाल, देवा गावंडे, सुरेश इंगळे, बंटी पाटील, मनोज बावीस्कर, रवी सातपुते, मुन्ना भाकरे, बालू चव्हाण, प्रमोद मराठे आदि शिवसैनिक व विदर्भवाद्यांनी परस्पर विरोधी घोषणा देणे सुरु केल्यानंतर अचानक शिवसैनिकांनी विदर्भवाद्यांना धक्काबुक्की सुरु केली. विदर्भवाद्यांच्या हातामधील फलक व झेंडा हिसकावून घेत शिवसैनिकांनी त्याची होळी केली. या प्रकाराची माहिती मिळताच सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांना विलंब झाला असता तर परिस्थिती चिघळण्याची दाट चिन्हं होती. आॅटोमध्ये केले रवाना!सिटी कोतवाली पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांची उपलब्ध वाहने व कार्यकर्त्यांची संख्या पाहता काही विदर्भवाद्यांना चक्क आॅटोत बसवून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी पोलिस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. अंगावर फेकली माती!मदनलाल धिंग्रा चौकात विदर्भवादी व शिवसैनिकांमध्ये तब्बल अर्धा तास घोषणाबाजी सुरु होती. यावेळी काही शिवसैनिकांनी विदर्भवाद्यांच्या अंगावर माती फेकली. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी केली.