शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसंग्रामला हवी भागीदारी; भाजपकडे दिला प्रस्ताव !

By admin | Updated: January 31, 2017 02:21 IST

कार्यकर्त्यांचे लक्ष; कुठल्या प्रभागात दिली जाईल उमेदवारी ?

अकोला, दि. ३0- राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसंग्राम संघटनेला आता महापालिका निवडणुकीत भाजपसोबत भागीदारी हवी आहे. शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम परिषदेला काही जागा देण्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी भाजपकडे सोपविण्यात आला. भाजपमधील इच्छुकांची भाऊगर्दी पाहता शिवसंग्रामसाठी पक्षाकडून किती जागा सोडल्या जातात, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटना उतरण्यासाठी सज्ज आहेत. राज्यात भाजप-शिवसेना युतीमध्ये सहभागी असलेल्या शिवसंग्राम संघटनेने आता महापालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचे समोर आले आहे. शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्या सूचनेनुसार मनपाच्या निवडणुकीत शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम परिषदेच्या वतीने उमेदवार उभे करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याकरिता भाजपच्या कोट्यातील जागा मिळवण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. त्यानुषंगाने सोमवारी शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप लोड, जिल्हाध्यक्ष नानासाहेब भिसे यांनी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांची भेट घेतली. महापालिकेच्या २0 प्रभागांमधून ८0 उमेदवार निवडून द्यावे लागतील. यावेळी भाजपसोबत युती करून भाजपच्या कोट्यातील काही जागांवर भारतीय संग्राम परिषदेचे उमेदवार उभे करण्याबाबत जिल्हाध्यक्ष नानासाहेब भिसे यांनी खा. संजय धोत्रे यांच्याकडे प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. भाजपमधील गर्दीचे काय ?नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पाचपैकी तीन नगरपालिकांवर भाजपाने झेंडा रोवला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर पडल्याचे वातावरण आहे. अशा स्थितीत मनपा निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची खच्चून गर्दी आहे. तिकिटासाठी पक्षाकडे रेटा लावून धरणार्‍यांची संख्या पाहता शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम परिषदेला नेमक्या किती जागा दिल्या जातात, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे. भाजपने साधली चुप्पीशिवसंग्राम संघटनेने भाजपकडे जागांचा प्रस्ताव दिला असला तरी नेमक्या कोणत्या प्रभागातील जागा संघटनेला द्यायच्या, यावर भाजपने चुप्पी साधली आहे. एका पॅनेलमध्ये चार उमेदवारांना उभे करायचे असल्याने पक्षाकडून यापूर्वीच समीकरणे बसविण्यात आली. आता ऐन वेळेवर भारतीय संग्राम परिषदेला कोणत्या जागा द्यायच्या, या मुद्यावर पक्षात खलबते सुरू झाली आहेत.