शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरची हळद, केळीची वाहवा!

By admin | Updated: December 12, 2014 23:58 IST

भरघोस नफा, वाशिम जिल्ह्यातील युवा शेतक-याचा गौरव.

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील शिरपूरजैन येथील एकरी ३0 क्विंटल उत्पादन देणारी हळद आणि भरघोस नफा देणार्‍या केळीची राष्टीय स्तरावर वाहवा झाली आहे. नागपूर येथे पार पडलेल्या ह्यअँग्रोव्हिजनह्ण या राष्ट्रीय स्तरावरील कृषी प्रदर्शनीत या दोन्ही उत्पादनांची प्रशंसा झाली. कृषी क्षेत्रात नाविण्यपूर्ण प्रयोग करून भरघोस उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांनी नागपूर येथील ४ ते ७ डिसेंबर दरम्यानच्या अँग्रोव्हिजन या कृषी प्रदर्शनात सहभाग नोंदविला. यावेळी शिरपूरजैन येथील युवा शेतकरी सचिन सारडा यांनीदेखील हळद व केळीच्या उत्पादनाची माहिती दिली. पारंपरिक शेतीला फाटा देऊन त्यांनी नवीन तंत्रज्ञानाने शेती केली. त्यांनी शेतीमध्ये हळद व केळीची बाग फुलवली. ठिबक सिंचनाचा वापर करून प्रायोगिक तत्त्वावर एका एकरमध्ये हळद व केळीची लागवड केली. हळदीचे एकरी उत्पादन ३0 क्विंटल येऊन, त्यांना जवळपास एक लाख ८0 हजाराचे उत्पन्न मिळाले. लागवड व संगोपन खर्च ६0 हजार रुपये येऊन, निव्वळ नफा एक लाख २0 हजार रुपये मिळाला. त्यांनी एका एकरात केळीची दोन हजार झाडे लावली. यातून तीन लाख ४0 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. लागवड खर्च ६५ हजार रुपये वगळला, तर दोन लाख ८५ हजाराचा निव्वळ नफा त्यांना झाला. सचिन सारडा यांनी त्यांची ही यशोगाथा मांडल्यानंतर कृषी प्रदर्शनात सर्वांनीच प्रशंसा केली. मानचिन्ह देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला. शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीचीच झालेली असताना, आधुनिक शेतीची कास धरल्यास चांगला नफा मिळू शकतो, हेच सचिन सारडा यांनी दाखवून दिले आहे.