शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शिवणीत टिप्परमालकाची हत्या

By admin | Updated: March 17, 2015 01:07 IST

मारेकरी फरार, पोलिसांकडून शोध सुरू.

अकोला - सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणी येथील राहुलनगरातील रहिवासी टिप्परमालकाची अज्ञात मारेकर्‍यांनी हत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. सचिन भटकर (३५) असे मृतक युवकाचे नाव आहे. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हत्येचे कारण आणि मारेकर्‍यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले असले तरी चार जणांना रात्री उशिरा संशयावरून ताब्यात घेण्यात आले. राहुलनगर येथील रहिवासी सचिन नाजुकराव भटकर (३५) याच्या मालकीचा टिप्पर असून, तो रेती, विटा यांसह विविध प्रकारचे साहित्य पोहचवण्याचा व्यवसाय करतो. रविवारी रात्री याच परिसरात असलेल्या एका खदानजवळ तो दोन वेळा शौचास गेला. त्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास आणखी तिसर्‍यांदा सचिन भटकर याच परिसरात गेला. तो पहाटेपर्यंत परत न आल्याने त्याच्या पत्नीने सासू-सासर्‍यांना माहिती दिली. त्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी सचिनचा शोध सुरू केला असता. त्याची चप्पल व इतर साहित्य या खदान परिसरात आढळले. त्यानंतर आणखी शोध घेतला असता, सोमवारी पहाटे त्याचा मृतदेहच राहुलनगर परिसरात आढळला. सचिन भटकरच्या डोक्यावर पाइपने जबर हल्ला चढविल्याचे त्याचा मृतदेह पाहून निदर्शनास आले. त्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. पोलिसांनी श्‍वानपथकाला पाचारण केले. श्‍वानपथकाने शिवणीतील खदान परिसरात एकाच जागेवर भटकत राहिले. त्यामुळे पोलिसांना पुढील सुगावा मिळू शकला नाही.