शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
7
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
8
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
9
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
10
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
11
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
12
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
13
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
14
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
15
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
16
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
17
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
18
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

शत्रुघ्न बिरकड, रोहिदास पवार, सागर गुल्हाने, अमित चव्हाण यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:39 IST

अकोला : बहुप्रतीक्षित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची अधिकृत घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केली. यामध्ये अमरावती विभागातील अमरावती, वाशिम व अकोला जिल्ह्यातील ११ खेळाडू, क्रीडा संघटक व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देक्रीडा जीवनावर संस्मरणीय असा प्रभाव पडला आहे, अशांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.अकोलाचे शत्रुघ्न हरिभाऊ बिरकड (सन २०१६-१७) व वाशिमचे रोहिदास रायसिंग पवार (सन २०१४-१५) यांना उत्कृष्ट क्रीडा संघटक व कार्यकर्त्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, वाशिमचेच सागर गणेश गुल्हाने (सन २०१४-१५) व अमित अनिल चव्हाण (सन २०१५-१६) यांना आट्या-पाट्या खेळाकरिता उत्कृष्ट खेळाडू म्हणून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे.

अकोला : बहुप्रतीक्षित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची अधिकृत घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केली. यामध्ये अमरावती विभागातील अमरावती, वाशिम व अकोला जिल्ह्यातील ११ खेळाडू, क्रीडा संघटक व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. अकोलाचे शत्रुघ्न बिरकड, वाशिमचे रोहिदास पवार, सागर गुल्हाने आणि अमित चव्हाण यांना पुरस्कार घोषित झाला आहे.अकोलाचे शत्रुघ्न हरिभाऊ बिरकड (सन २०१६-१७) व वाशिमचे रोहिदास रायसिंग पवार (सन २०१४-१५) यांना उत्कृष्ट क्रीडा संघटक व कार्यकर्त्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, तर वाशिमचेच सागर गणेश गुल्हाने (सन २०१४-१५) व अमित अनिल चव्हाण (सन २०१५-१६) यांना आट्या-पाट्या खेळाकरिता उत्कृष्ट खेळाडू म्हणून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे.पुरस्कार यादीत अमरावतीच्या पूर्वशा सुधीर शेंडे (आर्चरी), वृषाली दिनकर गोरले (आर्चरी थेट), नीता हरिभाऊ रंगे (आटया-पाटया), प्रमोद श्यामराव चांदूरकर (संघटक/कार्यकर्ता), तुषार प्रभाकर शेळके (आर्चरी), स्वप्निल सुनील धोपाडे (बुद्धिबळ थेट) यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार तसेच संगीता किरणसिंह येवतीकर यांना (संघटक/कार्यकर्ता) जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक/कार्यकर्ते, खेळाडू व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी खेळासाठी आपले सर्वस्व अर्पण करू न महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात अतुलनीय असे स्थान संपादिले आहे. तसेच ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा क्रीडा कार्यकर्तृत्वाचा महाराष्ट्राच्या क्रीडा जीवनावर संस्मरणीय असा प्रभाव पडला आहे, अशांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार राज्यातील ७६, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार १०९, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक-कार्यकर्ते) १२६, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) ३८७, राज्य क्रीडा साहसी पुरस्कार ३४, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) ४४, असे तिन्ही वर्ष मिळून एकूण ७७६ अर्ज शासनाला प्राप्त झाले होते. त्यामधून १९५ खेळाडू, संघटक, मार्गदर्शकांना पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरSportsक्रीडा