शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाची कामे प्रामाणिकपणे करावीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 19:40 IST

अकोला : जलयुक्त शिवार अभियानातील कार्य हे ईश्‍वरीय  कार्य असून, सदर काम प्रामाणिकपणे करावे, असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय जलसंधारण उपक्रम कार्यशाळेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जलयुक्त शिवार अभियानातील कार्य हे ईश्‍वरीय  कार्य असून, सदर काम प्रामाणिकपणे करावे, असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शेतकरी सदन  सभागृहात ब्लॉक टेक्निकल रिसोर्स टीम व इतर  अधिकार्‍यांकरिता जलसंधारणाच्या उपक्रमाच्या प्रशिक्षणाबाबत  आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती उपजिल्हाधिकारी  (रोहयो) अभयसिंह मोहिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  (पंचायत) श्रीराम कुळकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.जलयुक्त शिवार अभियान हा मुख्यमंत्री यांचा महत्त्वाकांक्षी  कार्यक्रम असून, मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या  अभियानांतर्गत झालेल्या जलसंधारणाच्या कामाचा परिणाम आ ता दिसून येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी आस्तिककुमार  पांडेय पुढे म्हणाले, की जलयुक्त शिवार अभियानात महात्मा  गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाच्या कामाची सांगड  घालून चातुर्याचा वापर करून अकुशल कामासोबत कुशल  कामे करून घ्यावी, असे सांगितले.आज कार्यशाळेत होणारे मार्गदर्शन लोकांपर्यत पोहोचवून आ पली नैतिक जबाबदारी पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी  म्हणाले. जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरीत्या राबविल्यामुळे  राष्ट्रसेवेसोबत समाजसेवा घडणार आहे. या कामासाठी  शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध असून, निधीची कमतरता  पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.गावातील जलसंधारणाच्या कामाचा कृती आराखडा तयार कर ताना गावातील तरुणांना विश्‍वासात घेऊन स्मार्ट फोनचा वापर  करून गुगल अँपच्या मॅपद्वारे त्यांना गावाचा नकाशा दाखवून  जलयुक्त शिवार अभियानात कामाचा कृती आराखडा तयार  करावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्रीराम  कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे  आभार जिल्हा गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रकाश अंधारे यांनी  मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहयोचे कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्‍वर  आगरकर, नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, कार्यक्रम  व्यवस्थापक सुनील वाघमारे, आशिष उमाळे यांनी परिश्रम घे तले. या कार्यशाळेला तहसीलदार रवी काळे, श्री पुंडे, विश्‍वनाथ  घुगे, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उ पअभियंता लघुसिंचन, वन परिक्षेत्र अधिकारी आदी उपस्थित होते.