शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

भूसंपादनातील अडचणींमुळे शहापूर धरणाची गती मंदावली!

By admin | Updated: June 30, 2016 01:57 IST

भूसंपादन रखडल्याने प्रकल्प तर रखडलाच; पण जमिनीच्या किमतीही वाढल्या.

विजय शिंदे / आकोट (जि. अकोला)शहापूर बृहत या मुख्य धरणाचे बांधकाम आकोट तालुक्यातील पणज या गावाजवळून वाहणार्‍या स्थानिक नाल्यावर लघू पाटबंधारे योजनेंतर्गत करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी २७ फेब्रुवारी २00९ रोजी ६२ कोटी ७७ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. सदर प्रकल्प तीन वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु, प्रकल्पासाठी आवश्यक शेतजमिनीचे संपादन होण्यास अडचणी निर्माण होऊन विलंब झाला. तसेच प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त न झाल्यामुळे प्रकल्पाचे काम विहित कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकले नाही. विशेष म्हणजे भूसंपादनाच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे प्रकल्पाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत या धरणाची किंमत २६१ कोटी रुपये झाली असून, प्रकल्पाचे काम सन २0१७ पर्यंत पूर्ण करावयाचे असून, अद्याप धरणाचे काम अर्धवट स्थितीत आहे.धरणांची लांबी ५५१0 मीटर व १७.१३ मीटर उंची असून, धरणाची एकूण साठवणूक क्षमता ७.७९0 द.ल.घ.मी. आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमता १३७३ हेक्टर असून, ताजनापूर, देऊळगाव, चंडिकापूर, चिंचखेड खु., सावरा, मंचनपूर, वडगाव मेंढे, वडाळी देशमुख या आठ गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे. सदर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामुळे कोणतेही गाव बाधित होत नाही. तसेच प्रकल्पातील 0.८८ द.ल.घ.मी. पाणी पिण्याकरिता व औद्योगिक वापराकरिता आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार आहे. अर्धवट स्थितीत असलेल्या धरणाचे काम स्वामी सर्मथ इंजिनिअरिंगचे बी.एस. माने हे कंत्राटदार करीत आहेत. धरण पूर्ण झाल्यावर मत्स्य व्यवसाय व इतर आनुषंगिक व्यवसाय सुरू होण्यास मदत होईल. प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ११९.६७५ चौ.कि.मी. असून, पाणलोट क्षेत्र हे सातपुड्याच्या डोंगर रांगामधील आहे. चिखलदरा हे पाणलोट क्षेत्रातील प्रमुख स्थळ आहे. या भागामध्ये पडणार्‍या पावसाचा इतिहास पाहता प्रत्येक वर्षी हे धरण पूर्ण भरणे शक्य आहे. याचा फायदा धरणाला व प्राधान्याने सभोवतालील शेतकर्‍यांना नक्कीच मिळेल. परंतु, सात वर्ष उलटूनही अद्यापपर्यंत हा प्रकल्प सिंचनाकरिता फायदेशीर ठरला नाही.