शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

By admin | Updated: August 4, 2016 01:40 IST

आरोपीने जबरदस्तीने प्रस्थापित केले शारीरिक संबंध; मुलीला गर्भधारणा.

अकोला, दि.३- अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळय़ात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वर्षभरापासून जबरदस्तीने लैंगिक शोषण करणार्‍या युवकाविरुद्ध आकोट फैल पोलिसांनी बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. आकोट फैल परिसरात राहणार्‍या एका १६ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी आकाश सिद्धार्थ काटे (रा. इंदिरा नगर) याने तिला प्रेमाच्या जाळय़ात ओढले. सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या. तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला; परंतु मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर आरोपीने आपण लग्न करणारच आहोत. संबंध प्रस्थापित करण्यास काय हरकत आहे, अशा शब्दात तिला समजाविले; परंतु मुलीने नकार दिला. आरोपी आकाश काटे याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि वेळोवेळी त्याने मुलीचे लैंगिक शोषण केले. यातून मुलीचा गर्भधारणा झाली. मुलीने त्याला लग्नाविषयी विचारले असता, तो टाळाटाळ करू लागला. पुढे पाहू, असे म्हणून लागला. मुलीने त्याला स्पष्ट शब्दात विचारणा केल्यावर आकाशने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. मुलीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने बुधवारी आकोट फैल पोलीस ठाण्यात कुटुंबासह धाव घेतली. पोलिसांकडे आपबिती कथन केली. पोलिसांनी तिच्या तक्रारीनुसार आरोपी आकाश काटे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ आणि बाल लैंगिक संरक्षण कायद्यानुसार (पॉस्को) गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.