शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांतील सिंचनाची शासनाला माहिती नाही!

By admin | Updated: March 27, 2017 02:54 IST

राज्याच्या आर्थिक पाहणीत माहिती उपलब्ध नसल्याची नोंद.

सदानंद सिरसाटअकोला, दि. २६- राज्यसरकारमध्ये विरोधात असताना सिंचनाच्या नावाने बोंब मारत श्‍वेतपत्रिका काढणार्‍या आताच्या सत्ताधार्‍यांना गेल्या सात वर्षांतील शेती सिंचन क्षेत्राची माहितीच नसल्याची धक्कादायक बाब २0१६-१७ च्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आली आहे.शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये, अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे, असे गोलमाल उत्तर सातत्याने राज्यातील जनतेला दिले जात असताना महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात शेतीसाठी सिंचन सुविधांची पोलखोल केली आहे. राज्याच्या नियोजन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान २0१६-१७ चा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये राज्याच्या सिंचनाखालील क्षेत्राच्या परिशिष्टात सिंचित क्षेत्राची माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. कृषी आयुक्तालयाने दिलेल्या माहितीचा आधार त्यासाठी घेतल्याची तळटीप आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार २0१0-११ ते २0१४-१५ या काळात राज्यातील सर्वच विहिरींची संख्या, सिंचनाची इतर साधने, त्यातून सिंचित झालेले निव्वळ क्षेत्र आणि एकूण क्षेत्राबाबतची माहिती उपलब्ध नसल्याचे दाखवण्यात आले आहे. तर सिंचन विहिरींची संख्या आणि त्यातून होणारे सिंचित जमिनीचे क्षेत्र याची माहिती, तर २00३-0४ पासून उपलब्ध नसल्याचे नमूद आहे. ही संपूर्ण माहिती राज्याच्या कृषी आयुक्तालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील किती शेतकर्‍यांना विविध साधनाद्वारे सिंचनासाठी पाणी मिळते. त्यातून किती शेती क्षेत्रावर सिंचन होते, ही बाब शासनालाच माहिती नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. त्यातच उठता-बसता शासन शेतकरी हिताचा आव आणत आहे. त्याचवेळी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणते उपाय राज्यात होत आहेत, ही बाबही या अहवालातून स्पष्ट होत आहे.