शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापौर पदासाठी सात जणांनी घेतले अर्ज

By admin | Updated: March 4, 2017 02:44 IST

उपमहापौर पदासाठी सहा जणांना उमेदवारी अर्जांचे वाटप.

अकोला, दि. ३- महापालिकेची निवडणूक आटोपल्यानंतर येत्या ९ मार्च रोजी आयोजित विशेष सभेत महापौर, उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडेल. या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्जांचे वाटप शुक्रवारी झाले असता महापौर पदासाठी भाजपच्यावतीने विजय अग्रवाल यांच्यासह सात जणांनी, तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या वैशाली शेळके यांच्यासह सहा जणांनी उमेदवारी अर्ज घेतले. शनिवारी संबंधित उमेदवारांचे अर्ज स्वीकारल्या जातील.महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महापौर, उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी प्रशासनाने ९ मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन केले आहे. महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्जाचे वाटप करण्यात आले. शनिवारी (४ मार्च) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. महापालिका क्षेत्रातील २0 प्रभागांतील ८0 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असता भाजपच्या वाटेला ८0 पैकी ४८ जागा आल्यामुळे भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग खुला झाला आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांमधून महापौर, उपमहापौर पदासाठी निवड करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी ९ मार्च रोजी विशेष सभेची तारीख निश्‍चित केली आहे. त्यानुषंगाने महापौर पदासाठी भाजपच्यावतीने विजय अग्रवाल, हरीश आलिमचंदानी, बाळ टाले, राहुल देशमुख, आशिष पवित्रकार, सुनीता अग्रवाल तसेच काँग्रेसच्यावतीने शेख मोहम्मद नौशाद यांनी उमेदवारी अर्ज घेतला. उपमहापौर पदासाठी भाजपच्यावतीने वैशाली विलास शेळके, शारदा खेडकर, आशिष पवित्रकार शिवसेनेच्यावतीने राजेश मिश्रा, गजानन चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज घेतले. शनिवारी मनपा प्रशासनाकडून दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारल्या जातील. काँग्रेसला राकाँ साथ देईल का?महापौर पदासाठी काँग्रेसच्यावतीने शेख मोहम्मद नौशाद यांनी उमेदवारी अर्ज घेतला. सद्यस्थितीत काँग्रेसचे संख्याबळ १३ असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ पाच आहे. एमआयएमचा एक उमेदवार निवडून आला आहे. मनपाची निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढली. अशा स्थितीत महापौर पदासाठी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने घेतलेला अर्ज पाहता राष्ट्रवादी व एमआयएम काँग्रेसला साथ देईल का, असा सवाल उपस्थित होतो. वेळप्रसंगी राक ाँने साथ दिली, तरीही काँग्रेसचे संख्याबळ १९ च्या वर जात नसून, भाजपसमोर हे संख्याबळ अतिशय तोकडे पडणार आहे.