शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आणखी सात आरोपींना अटक

By admin | Updated: March 18, 2017 02:44 IST

अकोट फैल पोलिसांवरील हल्ला प्रकरण; १४ आरोपींचा जामीन फेटाळला!

अकोला, दि. १७- अकोट फैलमधील दंगल प्रकरणातील १४ जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला, तर अकोट फैल पोलिसांनी या प्रकरणात आणखी सात आरोपींना गुरुवारी अटक केली, त्या सातही आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. रामदास मठ परिसरातील दुकान बंद करण्याच्या कारणावरून अकोट फैल पोलिसांवर व्यापार्‍यासह इतरांनी हल्ला चढविला होता. यानंतर अकोट फैल पोलिसांनी घटनास्थळ गाठून व्यापार्‍यासह अनेकांची धरपकड सुरू केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस दलासह सर्वच ठाण्याचे ठाणेदार व पोलिसांचे पथक घटनास्थळावर तैनात करण्यात आले आहेत. सोबतच पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांनीही घटनास्थळाला वारंवार भेट देऊन परिस्थितीची पाहणी सुरू केली आहे. तत्पूर्वी जमावाने अकोट फैल पोलीस ठाण्यावरही धाव घेऊन दगडफेक करीत वाहनांची तोडफोड केली होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी मो. सोयेब मो. आसिफ (१८), मो. आरीफ अब्दुल सत्तार (५५), शेख अब्दुला शेख हबीब (३७), अब्दुल मजित शेख हबीब (७0), शेख मुजीब शेख हबीब (३५), मिर्झा शॉ युसूफ शॉ (२४), अनिस अब्दुल सत्तार (३0), कयुम शॉ करीम शॉ (२१), शेख शाहदत शेख शब्बीर (२५),उस्मान शॉ लुकमान शॉ (३0), मो. इरफान मो. आरीफ (१९), मो. नईम मो. आरीफ (१८), मो. युसूफ मो. उस्मान (७0) यांना अटक केली. या सर्वांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर केला होता. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळला, तर अकोट फैल पोलिसांनी शुक्रवारी पुन्हा गफ्फार खॉ जब्बार खॉ (४0), शेख जमील शेख गणी (३२), मो. जामीन मो. अन्सार (४४), सलिम खान हजिज खान (३२), शेख जावेद शेख अस्लम (२८), शेख जुनेद शेख बब्बू (२२), जमिल खा जलिल खा (२३) सर्व राहणार युसूफ अली चौक यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या सात आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.