शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

सात लाखांचा गुटख्याचा साठा जप्त!

By admin | Updated: June 2, 2017 01:54 IST

विशेष पथकाची कारवाई: आरोपीस अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पोलीस पथकाने गुरुवारी सायंकाळी कोठडी बाजारातील अंबिका ट्रेडर्स आणि जगदंबा पान सेंटरवर छापा घालून सात लाख रुपये किमतीचा अवैध गुटख्याचा साठा जप्त केला. पोलिसांनी घनश्याम सीताराम अग्रवाल (५२) याला अटक केली. विशेष पोलीस पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना कोठडी बाजार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली. अळसपुरे यांनी पोलीस पथकासह कोठडी बाजारामधील घनश्याम अग्रवाल याच्या अंबिका ट्रेडर्स आणि जगदंबा पान सेंटर या दोन्ही दुकानांवर छापा घालून ७ लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा, सुगंधित तंबाखू, सुपारी, तंबाखूची पाकिटे असा साठा जप्त केला आणि घनश्याम अग्रवाल याला अटक केली. जप्त केलेला गुटखा पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द केला. तीन वर्षांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई येथील दक्षता पथकाने अग्रवाल याच्या दुकानांवर छापा घालून २५ लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला. त्यानंतर घनश्याम अग्रवाल याच्या दुकानावर एकही कारवाई करण्यात आली नाही. अन्न व औषध प्रशासनाने तर गुटखा माफियांकडे पूर्णत: डोळेझाक केली असून, शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याचा साठा गुटखा माफियांनी करून ठेवला आहे. तीन वर्षानंतर अळसपुरे यांनी अग्रवालविरुद्ध कारवाई करून मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला.