शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएमसी’तील सात निवासी डॉक्टरांची सेवा थांबविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:37 IST

सातही डॉक्टर अस्थिव्यंग शास्त्र विभागातील असल्याने विभागातील रुग्णसेवा प्रभावित झाली असून, गंभीर रुग्णांना थेट नागपूरला रेफर केले जात आहे.

अकोला : चार महिन्यांच्या थकीत वेतनासाठी आंदोलन करणाऱ्या सात निवासी डॉक्टरांच्या नियुक्तीचा नव्याने आदेश काढण्यास नकार देत त्यांची सेवा थांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सातही डॉक्टर अस्थिव्यंग शास्त्र विभागातील असल्याने विभागातील रुग्णसेवा प्रभावित झाली असून, गंभीर रुग्णांना थेट नागपूरला रेफर केले जात आहे.सर्वोपचार रुग्णालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे आॅक्टोबर २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंतचे वेतन थकीत असल्याने ११ फेब्रुवारी रोजी निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. महाविद्यालय प्रशासनाने वेतनाचा प्रश्न निकाली काढल्याने निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले होते; परंतु यानंतर १५ दिवसातच आंदोलनकर्त्या डॉक्टरांना त्याचा फटका बसला असून, सात निवासी डॉक्टरांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. हे सर्वच डॉक्टर अस्थिव्यंग शास्त्र विभागातील असून, महाविद्यालय प्रशासनाकडून त्यांची आॅर्डर नव्याने काढण्यात आली नाही. या विभागात एकूण दहा डॉक्टर होते. त्यापैकी सात डॉक्टर कमी झाल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. बाह्यरुग्ण विभागासह अपघात कक्ष आणि अस्थिव्यंग विभागातील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. बहुतांश अस्थिव्यंग रुग्णांना पुढील उपचारासाठी नागपूरला रेफर करण्यात येत असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.शिवहरी घोरपडे यांनी बोलण्यास नकार दिला.५०० रुग्णांचा भार दोन डॉक्टरांवरविभागातील सात डॉक्टरांची सेवा एकाच वेळी थांबविण्यात आली आहे, तर एका डॉक्टरच्या सेवेची मुदत संपणार असून, ते देखील पुढील रुग्णसेवा देणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विभागात केवळ दोनच निवासी डॉक्टर शिल्लक राहणार असून, त्यांच्यावर बाह्यरुग्ण विभाग, आपत्कालीन विभागासह अस्थिव्यंग वार्डातील ५०० पेक्षा जास्त रुग्णांचा भार आला आहे.डॉक्टरांसाठी रुग्णसेवेचे नियमवेतनासाठी डॉक्टरांच्या आंदोलनाला लगाम लावण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून डॉक्टरांसाठी अजब नियमावली करण्यात आली आहे. त्यानुसार, येथे रुग्णसेवा करायची असेल, तर ४ ते ६ महिने वेतन मिळाले नाही तरी डॉक्टर आंदोलन करणार नाही, असे बाँडवर लिहून घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे; मात्र वेतनासाठी वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याची मजबुरी असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला