शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सेतू केंद्रांच्या तपासणीसाठी सात पथके गठित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:24 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर सुरू आहे.  अर्ज भरण्यात येणार्‍या अडचणींचे निरसन आणि सेतू केंद्रांविरुद्ध  तक्रारींची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील से तू केंद्रांच्या तपासणीसाठी तांत्रिक तज्ज्ञांची सात पथके गठित करण्या त येत असल्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी  मंगळवारी दिला. 

ठळक मुद्देकर्जमाफीचे अर्ज भरण्यात अडचणी-तक्ररींची करणार तपासणीथकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर सुरू आहे.  अर्ज भरण्यात येणार्‍या अडचणींचे निरसन आणि सेतू केंद्रांविरुद्ध  तक्रारींची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील से तू केंद्रांच्या तपासणीसाठी तांत्रिक तज्ज्ञांची सात पथके गठित करण्या त येत असल्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी  मंगळवारी दिला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत  जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज सामूहिक  सेवा केंद्र (सीएससी) महाऑनलाइन केंद्र व आपले सरकार सेवा  केंद्रांवर भरण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात जिल्हा संनियंत्रण समि तीच्या बैठकीत अपर जिल्हाधिकारी राजेंद्र खवले यांनी जिल्ह्यातील  शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामाचा आढावा घेतला.  कर्जमाफी योजनेत जिल्हय़ातील शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज  भरण्याचे उद्दिष्ट जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात  आले. कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरताना   महाऑनलाइन, सीएससी व आपले सरकार सेवा केंद्रांना येणार्‍या  अडचणींचे निरसन आणि केंद्रांविरुद्ध तक्रारींची शहनिशा  करण्याकरिता जिल्ह्यात तालुकानिहाय तांत्रिक तज्ज्ञांची सात त पासणी पथके गठित करण्यात येत असल्याचा आदेश अपर  जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी या बैठकीत दिला.

तपासणी पथकात असे आहेत तांत्रिक तज्ज्ञ!सेतू केंद्रांच्या तपासणीसाठी तांत्रिक तज्ज्ञांची तालुकानिहाय सात त पासणी पथके गठित करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुका- प्री ती शिंदे (सीएससी, जिल्हा व्यवस्थापक), बाळापूर तालुका -  विशाल धोटे (अभियंता डीआयटी), बाश्रीटाकळी तालुका - प्रवीण  गडपायले (प्रकल्प व्यवस्थापक, डीआयटी), अकोट तालुका -  नीलेश सवलतकर (अभियंता डीआयटी),  पातूर तालुका -हुसेन  जावेद खान (अभियंता डीआयटी), मूर्तिजापूर तालुका - नवीन  कावल (अभियंता डीआयटी) व तेल्हारा तालुका- सुरज खाडे  (अभियंता डीआयटी ) इत्यादी तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश आहे.

‘या’ मुद्यांची होणार तपासणी!तांत्रिक तज्ज्ञ नेमून दिलेल्या तालुक्यातील दररोज किमान पाच सेतू  केंद्रांना भेट देऊन केंद्रावर शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी  आवश्यक संच (सेटअप) आहे की नाही, केंद्रचालकाकडून शे तकर्‍यांना पैशाची मागणी केली जात आहे काय, केंद्रावर शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम समाधानकारक आहे की नाही, इ त्यादी मुद्यांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीचा दैनंदिन  अहवाल सादर करण्याचे निर्देशही अपर जिल्हाधिकार्‍यांनी दिले  आहेत.