शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांमधील मैल्यावर होणार प्रक्रिया; मनपाची निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 13:04 IST

शिलोडा येथे २५ लाख रुपयांतून ‘एसटीपी’ची उभारणी केली जाणार असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयांची उभारणी केल्यानंतर शौचालयांच्या सेप्टिक टॅँकमधील मैल्याचे सुरक्षित व नियमित व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’(सिवरेज ट्रीटमेंट प्लांट)ची उभारणी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने मनपा प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली असून, एक निविदा अर्ज प्राप्त झाला आहे. शिलोडा येथे २५ लाख रुपयांतून ‘एसटीपी’ची उभारणी केली जाणार असल्याची माहिती आहे.‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात उघड्यावर शौच करणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे नागरी स्वायत्त संस्थांना निर्देश होते. नागरिकांना वैयक्तिक तसेच अद्ययावत सार्वजनिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर शहरांना हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट होते. यादरम्यान, शहरातील घनकचºयाचे व्यवस्थापन करून शहरे ‘स्वच्छ’ करण्याचाही समावेश होता. संबंधित शहरांमध्ये दोन्ही सुविधांची पूर्तता केल्यानंतर त्यांना ‘ओडीएफ प्लस’चा दर्जा दिला जात आहे. शौचालयांची उभारणी करणे इथपर्यंतच न थांबता शौचालयांच्या सेप्टिक टॅँकमधील मैल्याचे सुरक्षित व नियमित व्यवस्थापन करणे तसेच त्यावर प्रक्रिया करून संबंधित शहरांना ‘ओडीएफ प्लस प्लस’चा दर्जा आवश्यक आहे.त्यासाठी राज्य शासनाने मैल्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’ची उभारणी करण्याचे निर्देश दिले असता, मनपा प्रशासनाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाने निविदा प्रकाशित केली. यादरम्यान, मनपाला एक निविदा अर्ज प्राप्त झाल्याची माहिती असून, त्यावर येत्या एक-दोन दिवसांत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.शिलोडा येथे प्लांटची उभारणीमनपाच्या भूमिगत गटार योजनेतील ३० एमएलडी प्लांटचे निर्माण शिलोडा परिसरात करण्यात आले आहे. याच परिसरात शौचालयांमधील मैल्यावर प्रक्रिया करण्यासाठी २० ‘केएलडी’ प्लांट उभारल्या जाणार आहे. त्यासाठी २५ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

‘एसडीबी’ तंत्रज्ञान वापरण्याचे निर्देशशौचालयांमधील मैल्यावर प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने अहमदाबाद येथील पर्यावरण नियोजन व तंत्रज्ञान संस्थेचा अभिप्राय घेतला असता, माफक किमतीत आणि सहज परवडणाºया ‘स्लज ड्राइंग बेड’ (एसडीबी) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे सुचविण्यात आले आहे.या तंत्रज्ञानाला नागपूर येथील निरी संस्थेने मान्यता दिल्यानंतर शासनाने ‘एसटीपी’च्या उभारणीचे निर्देश जारी केले आहेत. मनपाने प्रकाशित केलेल्या निविदेत ‘एसडीबी’ तंत्रज्ञानाचा समावेश आहे का, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका