शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पालकांच्या सुविधेसाठी मदत केंद्राची स्थापना

By admin | Updated: March 4, 2016 02:01 IST

नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळण्यासाठी ११ मार्चपासून ऑनलाइन अर्ज करावे लागणार.

वाशिम: दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळण्यासाठी ११ मार्चपासून ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेदरम्यान पालकांचा गोंधळ उडू नये, म्हणून वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तालुकास्तरावर मदत केंद्राची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन अँक्ट) मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. राज्यभरातील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून त्या-त्या जिल्हय़ात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ जिल्हय़ात २९ फेब्रुवारी ते ९ मार्च २0१६ या कालावधीत खासगी शाळांनी नोंदणी करणे, ११ ते २८ मार्च २0१६ या दरम्यान पालकांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारणे आणि १ एप्रिल ते ५ एप्रिल २0१६ दरम्यान ड्रॉ काढणे असे वेळापत्रक राहणार आहे. गोरगरीब, शिक्षणाबाबत अनभिज्ञ व संगणकीय अज्ञान असणार्‍या पालकांना ऑनलाइनद्वारे अर्ज कसा भरावा, याबाबत फारशी माहिती नसू शकते. याचा फायदा नेट कॅफे, ऑनलाइन फार्म सुविधा केंद्रांचे संचालक घेऊ शकतात. पालकांकडून जादा फी घेऊन २५ टक्के मोफत कोट्यातील अर्ज ऑनलाइनद्वारे भरण्याचा धोका लक्षात घेता, वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तालुकास्तरावर मदत केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या मदत केंद्रावर पालकांना योग्य ती माहिती दिली जाणार आहे. याशिवाय अर्ज कसा भरायचा, नियम काय आहेत, अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची, याबाबत जनजागृती केली जाणार आहे.