शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिपरिचारिकांचे सेवा नियमितीकरण अडकले लालफीतशाहीत

By admin | Updated: May 28, 2016 01:41 IST

अकोला मंडळातील ३७५ परिचारिकांचा समावेश

मंगरुळपीर (जि.वाशिम ) : अकोला आरोग्य मंडळांतर्गत असलेल्या वाशिम, अकोला, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ३७५ बंधपत्रित अधिपरिचारिकांची सेवा नियमितीकरण प्रक्रिया लालफीतशाहीत अडकली आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक परिचारिकादिनीही नियमित न झाल्याने बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या आशेवर पाणी फिरले आहे.शासकीय नर्सिंग स्कूलमध्ये शासकीय खर्चावर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या परिचारिकांकडून किमान दोन वर्ष शासकीय सेवा द्यावी म्हणून बंधनपत्र लिहून घेतले जाते. बंधपत्रित कालावधी पूर्ण झाल्यावर ज्यांना सेवेत रहावयाचे असेल, अशा अधिपरिचारिकांच्या सेवा नियमित केल्या जाण्याचे प्रचलित धोरण असल्याचे समजते. त्याबाबत सन २00३ मध्ये आरोग्य संचालनालयाकडून पत्रव्यवहारही करण्यात आला होता. सदरच्या अधिपरिचारिकांच्या सेवा नियमित करण्याची बाब शासन स्तरावर प्रलंबित, प्रस्तावित असल्याने सदरच्या अधिकपरिचारिकांची माहिती व प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत अकोला परिमंडळाचे उपसंचालकांनी मंडळातील सर्व आस्थापनाकडून माहिती मागविली होती. ज्या परिचारिकांची दोन वर्षाची सेवा पूर्ण झाली, अशा अधिपरिचारिकांचे सेवा नियमितीकरणाचे प्रस्ताव सक्षम प्राधिकारी यांना पाठवून त्यांच्या सेवा नियमित करणे आवश्यक होते. मात्र, संबंधित कार्यालयाने याबाबत लेटलतिफ धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. हा प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अनेकदा मागणीही करण्यात आलेली आहे. विनाअट सेवेत समाविष्ट करण्याची मागणी बंधपत्रित अधिपरिचारिकांना विनाअट सेवेत नियमित करण्याची मागणी सेवा नियमित न केलेल्या अधिपरिचारिकांकडून केली जात आहे. सुरुवातीच्या सेवा आदेशानुसार बंधपत्रित अधिपरिचारिकांना दोन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण करणे आवश्यक होते. त्यानुसार ज्या परिचारिकांची दोन वर्षांची सेवा पूर्ण झाली, अशा अधिपरिचारिकांची सेवा अद्याप का पूर्ण करण्यात आली नाही, असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे.