शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नटवरलाल चौधरी यांना सेवाश्री पुरस्कार प्रदान

By admin | Updated: September 15, 2014 01:48 IST

नटवरलाल चौधरी खरे कर्मयोगी- श्रीकांत तिडके

अकोला : अकोल्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले नटवरलाल चौधरी यांचे व्यक्तिमत्त्व देववादी नसून, ध्येयवादी आहे. त्यामुळेच ते खरे कर्मयोगी असल्याचे मत प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके यांनी सेवाश्री पुरस्कार वितरण कार्यक्रमात रविवारी व्यक्त केले. विदर्भकेसरी ब्रजलाल बियाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणार्‍या सेवाश्री पुरस्काराचे वितरण १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३0 वाजता खंडेलवाल भवन येथे करण्या त आले. मागील १८ वर्षांंपासून क्विक अँड या जाहिरात संस्थेच्यावतीने सेवाश्री पुरस्काराचे वितरण केले जात आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार यमाजी मालकर, सेवाश्री पुरस्काराचे संयोजक सत्यनारायण रांदड उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नटवरलाल चौधरी यांना १९ वा सेवाश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढे बोलताना डॉ. श्रीकांत तिडके म्हणाले की, महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्य लढय़ात सहभागी झालेले नटवरलाल चौधरी यांना स्वराज्य नव्हे तर सुराज्य हवे होते. त्यामुळे त्यांनी समाजकार्य सुरू केल्यानंतर जेथे पावले टाकले तेथे त्यांच्या पाऊलखुणा उमटल्या.सध्या वृद्धांची होत असलेली उपेक्षा पाहून वृद्धाश्रमांची नितांत गरज वाटत असल्याची खंतही तिडके यांनी बोलून दाखविली. वृद्धाश्रम हे सरकारी अनुदानावर चालू नये तर सुजाण लोकांनी त्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला हवे, असे मत डॉ. श्रीकांत तिडके यांनी व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना चौधरी यांनी समाजसेवी संस्थांनी जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले.