शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाउन: पीक विम्यात अडचणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:53 IST

बाळापूर: शासनाने पीक विमा काढण्याची मुदत ४ ऑगस्टपर्यंतच वाढविली आहे; परंतु ऑनलाइन विमा काढण्यासाठी कंपनीची साइट ओपन होत नाही व बँकांना शासननिर्णयानुसार बिगर कर्जदार शेतकर्‍यांचा पीक विमा न काढण्याबाबत सूचना असल्यामुळे शेतकर्‍यांची प्रचंड गैरसोय होत आहे. तरी बँकांनी ४ ऑगस्ट रोजी बँकेत येणार्‍या सर्व शेतकर्‍यांचा पीक विमा स्वीकारावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे. 

ठळक मुद्देपीक विमा काढण्याची आज अंतिम मुदत बिगर कर्जदारांचाही पीक विमा काढण्याची मागणी तांत्रिक अडचणींनी शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर: शासनाने पीक विमा काढण्याची मुदत ४ ऑगस्टपर्यंतच वाढविली आहे; परंतु ऑनलाइन विमा काढण्यासाठी कंपनीची साइट ओपन होत नाही व बँकांना शासननिर्णयानुसार बिगर कर्जदार शेतकर्‍यांचा पीक विमा न काढण्याबाबत सूचना असल्यामुळे शेतकर्‍यांची प्रचंड गैरसोय होत आहे. तरी बँकांनी ४ ऑगस्ट रोजी बँकेत येणार्‍या सर्व शेतकर्‍यांचा पीक विमा स्वीकारावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे. ऑनलाइन साइट ओपन होत नाही व बिगर कर्जदार शेतकर्‍यांचा पीक विमा काढू नये, असे निर्देश बँकांना शासनाकडून देण्यात आले आले आहेत. अशा परिस्थितीत पीक विमा कोठे काढावा, याबाबत चौकशी करण्यासाठी गाडेमोड कुपटा येथील अँड. बाळकृष्ण भाजीपाले, बाजार समितीचे संचालक राजेश नळकांडे यांनी तहसीलदार दीपक पुंडे, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर यांची भेट घेऊन त्यांना समस्या सांगितली. त्यामुळे या अधिकार्‍यांनी संबंधित सर्व बँक अधिकार्‍यांशी संपर्क साधून चर्चा केली. तेव्हा संबंधित बँक अधिकार्‍यांनी ते शासन निर्णयानुसार ४ ऑगस्टपर्यंत कर्जदार शेतकर्‍याचा पीक विमा काढू शकतात. बिगर कर्जदार शेतकर्‍यांना पीक विमा काढण्यासाठी  ई-महा-सेवा केंद्रातून ऑनलाइन पीक विमा काढावा लागेल, असे सांगितले; परंतु पीक विमा ऑनलाइन काढण्यासाठी आवश्यक असलेली साइट ओपन होत नसल्यामुळे शेतकर्‍यांची चांगलीच कोंडी होत आहे. 

तांत्रिक अडचणींनी शेतकरी त्रस्तबोरगाव मंजू : पंतप्रधान विमा योजनेचे अर्ज भरताना सर्व्हर डाउन होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गुरुवारी अनेक शेतकर्‍यांना फॉर्मच भरता न आल्याने परिसरातील ३0 गावांतील शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीक विमा योजना काढताना अनेक अडचणी येत असल्याने शासनाने मुदत वाढविली आहे; मात्र तरीही ऑनलाइन अर्ज दाखल करताना शेतकर्‍यांना अनेक अडचणी येत आहेत. कागदपत्रांची पूर्तता करून बोरगाव मंजू येथील केंद्रावर गर्दी करीत आहेत.