शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात सात सप्टेंबरपासून ‘सेरो’ सर्व्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 20:07 IST

हा सर्वे सप्टेंबर अखेरपर्यंत राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

अकोला : जिल्ह्यात कोविड १९ या विषाणू संसगार्ची स्थिती जाणून घेण्यासाठी सेरॉलॉजिकल सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाची सुरुवात सोमवार पासून होणार असून, हा सर्वे सप्टेंबर अखेरपर्यंत राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. जिल्हाधिकारी यांच्या दालनात यासंदर्भात बैठक घेण्यात आलीयावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, मनपा आयुक्त संजय कापडणीस, डॉ. कुसूमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, डॉ. उमेश कवळकर, डॉ. नेताम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्ह्यात प्रत्यक्ष ज्या तपासण्या झाल्या त्या व्यतिरिक्त किती लोकांपर्यंत कोविड चा संसर्ग पोहोचला, किती जणांना त्याची बाधा होऊन त्यांच्या शरिरात जैव प्रतिकार शक्ती तयार झाली, त्यातून समुहाची प्रतिकारशक्ती तयार झाली की नाही, यासंदर्भात या सर्वेक्षणातून माहिती मिळणार आहे. असे सर्वेक्षण भारतीय वैद्यकीय अनुसंधानतर्फे देशात सध्या ८० जिल्ह्यात सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने अकोला जिल्ह्यातही हे सर्वेक्षण राबविण्याची भूमिका घेतली असून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सोमवार, ७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

लाखामागे १०० जणांचे नमुणे घेणार!त्यासाठी एक लाखामागे १०० व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने घेऊन सर्वेक्षण केले जाईल. शहरी भागातून १४०० रक्त नमूने तर ग्रामीण भागातून १४०० असे एकूण २८०० रक्त नमूने घेण्यात येणार आहे. चाचण्या करण्यासाठी ज्यांना आतापर्यंत कोरोना झालेला नाही अशा लोकांच्या रक्ताचे नमुने वेगवेगळ्या समुहातून घेण्यात येतील. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील, शहरी, ग्रामिण, अति अजोखमीचे व्यक्ती, विविध वयोगटातील व्यक्ती या प्रमाणे विविध गटांमधील व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने आरोग्य यंत्रणेमार्फत संकलित करुन चाचण्या केल्या जातील. या चाचण्यांमधून त्या त्या व्यक्तिच्या शरिरात तयार झालेल्या प्रतिजैविक पेशींबाबत माहिती मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला