शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात प्रथमच ज्येष्ठ महिलांचे अधिवेशन

By admin | Updated: December 4, 2014 23:58 IST

१५ डिसेंबरला अकोल्यात आयोजन.

अकोला:ज्येष्ठ महिलांना भेडसावणार्‍या समस्या व त्यांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने विदर्भात प्रथमच ज्येष्ठ महिलांसाठी अधिवेशन आयोजित केले जात आहे. १५ डिसेंबर रोजी अकोल्यात होऊ घातलेल्या या एक दिवसीय अधिवेशनात पाच जिल्ह्यातील ज्येष्ठ महिला सहभागी होणार आहेत.महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्यावतीने विदर्भात प्रथमच ज्येष्ठ महिलांसाठी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ डिसेंबर रोजी अकोल्यातील रामदासपेठ परिसरातील स्वामी सर्मथ केंद्रात सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत हे अधिवेशन पार पडेल. ज्येष्ठ महिलांना एकत्र आणणे, त्यांना उतारवयात भेडसावणार्‍या कौटूंबिक, मानसिक व शारिरीक समस्यांवर प्रकाशझोत टाकणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे, हा या अधिवेशनामागचा उद्देश आहे. महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षा अलका व्यास या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी उपस्थित राहतील. राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ.आशा मिरगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील. उतारवयात ज्येष्ठ पुरुष, महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. शारिरीक, मानसिक तसेच कौटूंबिक समस्या लक्षात घेता, ज्येष्ठ नागरिकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होते. आयुष्यातील अडचणींवर मात करून सामाजिक एकोपा निर्माण व्हावा, याकरीता ज्येष्ठ महिलांसाठी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चौथमल सारडा यांनी स्पष्ट केले.