शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या मेळाव्यासाठी चार शेतकऱ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 01:21 IST

नाशिकमध्ये आज सेनेचा शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात शिवसंपर्क अभियान सुरू केल्यानंतर आता नाशिक येथे उद्या (१९ मे) शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यासाठी शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, गुरुवारी सर्व पदाधिकारी आणि शेतकरी नाशिकसाठी रवाना झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय घेऊन शिवसेनेने राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. अभियानच्या माध्यमातून पक्ष बांधणीवर जोर दिला जात असतानाच विधानसभा मतदारसंघनिहाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. शिवसंपर्क अभियानची सुरुवात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये केल्यानंतर पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी नाशिक येथे १९ मे रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करणार असल्याचे सूतोवाच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि त्यावर उपाय शोधण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका उद्धव ठाकरे यांनी ठेवला होता. शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न राहील, असे दिसून येते. मेळाव्यासाठी शेतकरी रवानानाशिक येथील मेळाव्यासाठी जिल्ह्यातील प्रमोद पागृत, ज्ञानेश्वर गावंडे, गजेंद्र देशमुख, राजेश पागृत या चार शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यासह सेना पदाधिकारी गुरुवारी नाशिककडे रवाना झाले आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रणनीती आखल्या जाईल. जुलै महिन्यात शेतकऱ्यांना सोबत घेऊन पक्षाच्यावतीने ‘लाँग मार्च’ काढला जाणार असल्याची माहिती आहे. पक्ष प्रमुखांच्या आदेशानुसार कामकाज केले जाईल. - नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख, शिवसेना